भाजपच्या पोलखोल अभियान प्रचार रथाची तोडफोड, शिवसेनेचे तोडफोड केल्याचा भाजपचा आरोप

377 0

मुंबई – आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून पोलखोल अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी पोलखोल अभियान पोलखोल रथ तयार करण्यात आलेला आहे. हा रथ मुंबईत फिरविण्यात येत आहे. दरम्यान, चेंबूरमध्ये या पोलखोल अभियान गाडीची रात्री तोडफोड करण्यात आली.

आजपासून चेंबूरमधून भाजपच्या पोलखोल अभियान उदघाटन होणार होते. त्याआधीच गाडीवर अज्ञात लोकांनी दगड मारत तोडफोड केल्याचे समोर आले आहे. शिवसेनेकडून हा भ्याड हल्ला करण्यात आल्याचा आरोप या कार्यक्रमाचे आयोजक राजेश शिरवाडकर यांनी केला आहे. आम्ही अशाने घाबरणारे नाहीत. त्यांची पोलखोल करणार,असा इशारा यावेळी भाजपकडून देण्यात आला आहे.

तोडफोडीच्या या घटनांमुळे भाजप नेते आक्रमक झाले आहेत. शिवसैनिक तसेच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचाच यामागे हात असल्याचा संशय भाजप नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला आहे. आमच्या पोलखोल अभियान प्रचार रथाची तोडफोड विरोधकांकडून करण्यात आली आहे. शिवसेनेचा पालिकेतील कारभार सगळ्यांनाच माहित आहे. आम्ही लोकशाही पद्धतीने हा विरोध करत आहोत. आंदोलन करत आहोत. तो आमचा अधिकार आहे. पोलिसांनी अर्ध्या तासात आरोपींना न पकडल्यास पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन करणार. तसेच, यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला पोलिसच जबाबदार असतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

पोलिसांना वरिष्ठांकडून तपास रोखण्याचे आदेश येऊ शकतात. यासंदर्भातील सीसी टीव्ही फुटेजही गायब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांना लवकरात लवकर आरोपींना पकडण्याचे आवाहन केल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

Share This News

Related Post

Kolhapur News

Kolhapur News : कोल्हापुरात हिजाबवरून पेटला वाद; कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे जय श्री रामच्या घोषणा देत आंदोलन

Posted by - July 18, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापूरमधून (Kolhapur News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये कोल्हापूरमधील (Kolhapur News) विवेकानंद कॉलेजमध्ये हिजाबवरून मोठा वाद…

Unknown नंबर नाही तर कॉल करणाऱ्याचं नाव दिसणार मोबाईल स्क्रीनवर; Spam Calls पासून होणार सुटका

Posted by - November 18, 2022 0
Spam Calls च्या त्रासापासून लवकरच मोबाईल युजर्सची सुटका होणार आहे. Spam Calls रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने मोठा निर्णय घेतला…
Vijay Shivtare

अखेर बंड शमलं; विजय शिवतारे यांची बारामती लोकसभेतून माघार

Posted by - March 30, 2024 0
सासवड: विजय शिवतारेंनी बारामती लोकसभेतून माघार घेतल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र या निर्णयाचा फायदा बाकीचे उमेदवार सुनेत्रा पवार आणि सुप्रिया…

VIDEO : ‘ बापूजी को रिहा करो ‘ घोषणा फलकांसह आसाराम बापूच्या 5 हजार भक्तांचा पुण्यात मूक मोर्चा

Posted by - August 30, 2022 0
पुणे : संत श्री आसारामबापू यांच्या अटकेला 30 ऑगस्टला 9 वर्ष होऊनही जामीन, पॅरोल न मिळाल्याने तो मिळावा, फास्ट ट्रॅक…

Loksabha Elections : पनवेल विधानसभा मतदारसंघात मतदानप्रक्रियेसाठी १२५ वाहनांची व्यवस्था

Posted by - May 12, 2024 0
मुंबई : पनवेल विधानसभा मतदारसंघातील ५४४ मतदान केंद्रांसाठी २७ टेबलद्वारे मतदान साहित्याचे वितरण पनवेल येथील ए.आर. कालसेकर पॉलिटेक्निक कॉलेज या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *