Manoj Jarange Patil

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला ‘या’ कारणामुळे पोलिसांनी नाकारली परवानगी

1485 0

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आमरण उपोषण करुन राज्यभरात रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. मनोज जरांगे हे शनिवारपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसणार होते.

यापूर्वी आंतरवाली सराटीच्या गावकऱ्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला विरोध केला होता. त्यानंतर आता पोलिसांनी त्यांच्या आमरण उपोषणाला परवानगी नाकारली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्य सरकारला आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानुसार ते उद्या म्हणजेच शनिवार, 8 जूनपासून तीव्र आंदोलनाच्या तयारीत होते. या आंदोलनाला अंतरवलीच्या गावकऱ्यांनी विरोध दर्शवत 4 दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.

त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला परवानगी नाकारल्याचे समजते.तसेच उपोषणाच्या जागे बाबत ग्रामसभेचे कोणतेही कागदपत्र सादर न केल्या मुळे त्यांना ही परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

 

 

Share This News

Related Post

CM EKNATH SHINDE

कार्तिकी एकादशी : महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका सर्वदूर फडकू दे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - November 3, 2022 0
मुंबई : ‘देशाचा मानबिंदू असणाऱ्या आपल्या महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका अशीच सर्वदूर फडकू दे. अन्नदाता शेतकरीराजा, कष्टकरी, मेहनती उद्यमी बांधवांच्या आयुष्यात…

रुपाली पाटील-ठोंबरे यांची फेसबुकवर बदनामी; मनसेच्या 16 पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा

Posted by - April 29, 2022 0
पुणे- फेसबुकवर ‘एक करोड ताईवर नाराज’ असणाऱ्यांचा ग्रुप तयार करून अश्लील भाषेत शिवीगाळ करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे…
Nanded Crime

Nanded Crime : नांदेडमध्ये ‘मुळशी पॅटर्न’ ! 22 जणांकडून तरुणाची तलवारीने सपासप वार करून निर्घृणपणे हत्या

Posted by - November 8, 2023 0
नांदेड : आपण मुळशी पॅटर्न चित्रपट पहिलाच असेल. या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या घटनेचा प्रत्यय नांदेडमध्ये (Nanded Crime) पाहायला मिळाला. यामध्ये…

CRIME NEWS : धक्कादायक ; आईला मारहाण केल्याच्या कारणावरून मुलानेचं घेतला बापाचा जीव

Posted by - August 16, 2022 0
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळीत गावामध्ये शिवाजी थोरात यांने आपल्या पत्नीस घरगुती भांडणाच्या रागातून कुर्‍हाडीने पाठीवर वार केला होता.…
pune police

Pune Police : मृत्यूनंतरही देशसेवा! ‘त्या’ पोलिस कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी अवयवदानाचा घेतला निर्णय

Posted by - August 15, 2023 0
पुणे : मरावे परी किर्ती रुपे उरावे, हे वाक्य पुण्यातील एका (Pune Police) पोलिसानं सिद्ध केलं आहे. अपघात (Pune Police)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *