पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा सराईतांवर कारवाईचा धडाका कायम ; अजय विटकर आणि टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

213 0

पुणे : पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारी टोळक्यांवर मोक्का अंतर्गत 98 कारवाई केली आहे. शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर वचक बसावा आणि शहरांमध्ये शांतता सुव्यवस्था प्रस्थापित रहावी या उद्देशाने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कारवाईचा जबरदस्त बडगा कायम ठेवला आहे.

दरम्यान चतुशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहशत पसरवणारा सराईत गुन्हेगार अजय विटकर आणि त्याच्या टोळीतील सात जणांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये या टोळीचा प्रमुख अजय विटकर वय वर्ष 20 ,विजय विटकर वय वर्ष 18, दत्ता धोत्रे वय वर्ष 22 ,सागर धोत्रे वय वर्ष 27, सिद्धार्थ गायकवाड वय वर्ष 23 ,कृष्णा उर्फ तिची माने वय वर्ष 25 ,यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

तर यापैकी अतुल धोत्रे वय वर्ष 22 आणि विजय उर्फ चपाती विटकर वय वर्ष 23 हे फरार आहेत. खुनाचा प्रयत्न ,जबरी चोरी, मारामारी ,गंभीर दुखापत ,जीवे मारण्याची धमकी ,बेकायदा शस्त्र बाळगणे ,वाहनांची तोडफोड करून नुकसान करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे या सराईत गुन्हेगारांवर दाखल आहेत.

Share This News

Related Post

वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी कडक उपाययोजना – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted by - March 24, 2023 0
मुंबई : जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी अद्ययावत आयटीएम्स यंत्रणा बसविण्यात येत असून वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी वाहतुकीचे…

धक्कादायक ! जमिनीवर नाक घासायला लावल्याच्या कारणावरून तरुणाने घेतला गळफास

Posted by - April 19, 2022 0
पुण्यातील दिघीमध्ये चार जणांनी बेदम मारहाण करत जमिनीवर नाक घासायला लावल्याच्या कारणावरून एका २९ वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली.…

#PUNE CRIME : “इथे धंदा का करतो… ?”असे धमकावून हॉटेल मालकाने केला प्रतिस्पर्धी हॉटेल मालकावर केला धारदार शस्त्राने हल्ला

Posted by - February 8, 2023 0
पुणे : व्यवसायामध्ये वृद्धी करण्यासाठी सर्वच व्यवसायिक वेगवेगळे मार्केटिंगचे फंडे वापरत असतात. अशातच पुण्यातील एका हॉटेल मालकाने फ्री सूप देण्याचा…

#PUNE CRIME : कोयता घेऊन रिल्स बनवणे तरुणांना पडले महागात; नऊ जणांवर गुन्हा दाखल; पोलिसांची सोशल मीडियावरही करडी नजर

Posted by - January 24, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये सध्या गुन्हेगारीन डोकं वर काढल आहे. कोयता गँगने काही दिवसांपासून पुणे शहरांमध्ये धुमाकूळ घातला असताना मोठ्या प्रमाणावर…
Odisha Train

ओडिशा रेल्वे दुर्घटनेचे कारण आले समोर; रेल्वे मंत्र्यांनी दिली मोठी माहिती

Posted by - June 4, 2023 0
बालासोर : ओडिशाच्या (Odisha) बालासोर इथे शुक्रवारी रेल्वेचा भीषण अपघात झाला. शालिमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस (Shalimar-Chennai Central Coromandel Express) आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *