पुणे महानगरपालिकेची अंतिम प्रभागरचना आठवडाभरात होणार जाहीर होण्याची शक्यता

401 0

पुणे- सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याच्या सूचना दिल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगानं कंबर कसली असून आगामी महापालिका निवडणुकीसाठीची अंतिम प्रभागरचना येत्या आठवडाभरात जाहीर होणार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

त्यासाठी राज्य निवडणूक विभागाने आज महापालिका आयुक्तांसह निवडणूक विभागाच्या अधिकार्‍यांना मुंबईला बोलाविले आहे. या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत अंतिम प्रभागरचनेचे सादरीकरण होणार असल्याचेही सांगण्यात आले.

राज्यातील तब्बल 18 हून अधिक महापालिकांचा कार्यकाळ संपला असून, त्यावर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, यासंबंधीचा कायदाही विधिमंडळात एकमताने करण्यात आला आहे. दरम्यान, यासंबंधीच्या निर्णयाविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी देताना सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यांत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, 11 मार्चपर्यंत प्रभागरचना करण्याची जी कार्यवाही झाली होती, तीच पुढे कायम ठेवण्याचे आदेशही दिले. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचना करण्याची कार्यवाही सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे.

Share This News

Related Post

…म्हणून शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ख्याती असलेल्या तुकाराम मुंढे यांची बदली

Posted by - November 29, 2022 0
शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ख्याती असलेले प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी तुकाराम मुंडे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. सध्या तुकाराम…

खासदार नवनीत राणा यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा

Posted by - April 13, 2022 0
अमरावती- खासदार नवनीत रवी राणा यांना केंद्रीय गृहमंत्रालयाद्वारे वाय प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. या निर्णयामुळे खासदार नवनीत रवी…
Nashik Crime News

Nashik Crime News : नाशिक हादरलं ! मांत्रिक महिलेची भक्तानेच केली हत्या

Posted by - July 8, 2023 0
नाशिक : नाशिकमध्ये (Nashik Crime News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मांत्रिक महिलेची तिच्याकडे उपचारांसाठी येणाऱ्या भक्तानेच चाकूने…

Breaking News ! पुण्यात वानवडी भागात स्लॅब कोसळला, पाच मजूर जखमी

Posted by - May 2, 2022 0
पुणे- वानवडी भागात अलंकार हॉलसमोर बांधकाम सुरु असताना अचानक स्लॅब कोसळल्यामुळे पाच मजूर गंभीर जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर…

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा विजय

Posted by - March 10, 2022 0
नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येऊ लागले असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विजयी झाले आहेत.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *