पुणे महापालिकेकडून गुंठेवारी नियमितीकरणाला ३० जूनपर्यंत मुदतवाढ

129 0

पुणे- पुणे महापालिका प्रशासनाने गुंठेवारी नियमितीकरणाला पुन्हा मुदतवाढ दिली आहे. आता 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली आहे.

शहरातील महापालिकेच्या हद्दीत अनेकांनी अनधिकृतपणे बांधकामे केली आहेत. बेकायदेशीररित्या बांधण्यात आलेल्या या बांधकामांसाठी गुंठेवारीतील घरे नियमित करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली. त्यासाठी १० जानेवारी ते 31 मार्चपर्यन्त प्रस्ताव दाखल करण्याची मुदत दिली होती. महापालिकेच्या या मोहिमेला आतापर्यंत केवळ 77 नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे.

नियमितीकरणाची प्रक्रिया क्लिष्ट असल्याने अनेक नागरिकांनी याकडे पाठ फिरवली आहे. अनधिकृत बांधकाम अधिकृत करवून घेत असताना संबंधित नागरिकाला हा प्रस्ताव इंजिनिअरच्या माध्यमातून सादर करावे लागतात. मात्र यासाठी इंजिनिअर भरमसाठ फी आकारत असल्याने नागरिक याकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे आता महापालिकेने गुंठेवारीचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी आर्कीटेक्ट अथवा इंजिनिअरने 5 हजार रुपये फी आकारावी, असे आवाहन केले आहे.
आता ही मुदत संपल्यामुळे आता ३० जूनपर्यंत प्रस्ताव दाखल करण्याची मुदत दिली आहे.

काय नियमितीकरण मोहीम

बांधकाम नियमावलीतील अटींमुळे छोट्या भुखंडांवर महापालिकेची परवानगी घेउन घरे बांधण्यात अडचणी येत असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी अनधिकृतपणे ही बांधकामे केली आहेत. यापैकी जी घरे नियमान्वित होऊ शकतात, त्यांचे नियमितीकरण करण्यासाठी राज्य शासनाने गुंठेवारी कायद्यान्वये ती शुल्क आकारून अधिकृत करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

Share This News

Related Post

महाविकास आघाडीचा महामोर्चा; संजय राऊत सुप्रिया सुळे मोर्चास्थळी दाखल

Posted by - December 17, 2022 0
मुंबई: महाविकास आघाडीच्या वतीने आज मुंबईत विराट महामोर्चाच आयोजन करण्यात आलं असून या महामोर्चात समविचारी पक्ष, महाराष्ट्र प्रेमी महापुरुषांना माणणारे…

रशिया-युक्रेन संकटात सोन्याने विक्रमी पातळी गाठली ! किंमत 51,000 ओलांडली

Posted by - February 24, 2022 0
नवी दिल्ली – रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. या हल्ल्याचा निषेध करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी म्हटले आहे की…

पंढरपुरात खासदार धनंजय महाडिक यांना मोठा धक्का; 11 पैकी सात ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीची सत्ता

Posted by - December 20, 2022 0
पंढरपूर : राज्यात आज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा टप्प्याटप्प्याने निकाल जाहीर होतो आहे. आज राज्यातील 7000 हुन अधिक ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर…

युक्रेन येथून जिल्ह्यातील १०२ विद्यार्थी सुखरूप परतले ; जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट

Posted by - March 7, 2022 0
युक्रेन देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्याने भारतातून युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या १०२ विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणण्यात शासन व प्रशासनाला यश आले…

‘….. तर मला एक नाही दोन जोडे मारा’, किरीट सोमय्या चप्पल दाखवत म्हणाले

Posted by - February 16, 2022 0
नवी दिल्ली- अलिबागमधील 19 घरांचा टॅक्स रश्मी उद्धव ठाकरे यांनी भरला आहे. बंगले जर ठाकरेंच्या नावे नाहीत तर टॅक्स भरता…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *