75 Rupees Coin

मोदी सरकार आणणार 75 रुपयांचं नाणं; काय आहे याची खासियत?

794 0

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी मोदी सरकार (Modi Government) आणि RBI ने मिळून 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. यानंतर आता मोदी सरकार चलनात 75 रुपयाचं नाणे बाजारात आणणार असल्याचे समजत आहे. 28 मे रोजी नव्या संसद भवनाचं उद्घाटन होणार यावेळी हे 75 रुपयांचे नाणे (75 rupees coin) लॉंच होण्याची शक्यता आहे. अर्थमंत्रालयाकडून (Ministry of Finance) गुरुवारी याबाबत माहिती देण्यात आली आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने अमृत महोत्सव देशभरात साजरा केला जात आहे. याचं महत्त्व आणि हा सुवर्णक्षण या कॉइनद्वारे संपूर्ण भारतात पोहोचवण्यात येणार आहे. या नाण्याच्या एका बाजूला अशोक स्तंभाचा सिंह आणि त्याखाली सत्यमेव जयते असे लिहिलेले आहे. याशिवाय देवनागरी लिपीमध्ये भारत हा शब्द दुसऱ्या बाजूला इंग्रजीमध्ये इंडिया असे लिहिले आहे.

काय आहे या नाण्याची खासियत?
75 रुपयांचे हे नाणे 44 मिलिमीटर व्यासाचे गोलाकार आकाराचे असेल. त्याच्या बाजूला 200 सेरेशन्स असतील. 35 ग्रॅम वजनाचे हे नाणं 4 धातूंपासून तयार करण्यात आलं आहे. या नाण्यामध्ये 50% चांदी, 40% तांबे, 5% निकेल आणि 5% जस्त चा वापर करण्यात आला आहे.

Share This News

Related Post

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

Posted by - June 9, 2022 0
राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चार दिवसांपूर्वी कोरोनाची लागण होती. याबाबत त्यांनी स्वत: ट्वीट करून माहिती…

बालगंधर्व रंगमंदिराचा होणार कायापालट, पण रंगकर्मींचा विरोध

Posted by - May 9, 2022 0
पुणे- बालगंधर्व मंदिराच्या पुनर्विकास मॉडेलला मंजुरी मिळाल्यामुळे आता बालगंधर्व रंगमंदिर पाडले जाणार हे निश्चित झाले आहे. बालगंधर्व मंदिराच्या पुनर्विकासाबाबत राज्याचे…

MPSC ची मोठी घोषणा ! प्रथमच ‘दुय्यम निबंधक’ पदाची भरती; ८०० पदांची जाहिरात प्रसिद्ध

Posted by - June 23, 2022 0
मुंबई- महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ ची आठशे पदांच्या भरतीची जाहिरात आज…
Tuljapur Mandir

Sambhaji Raje Chhatrapati : छत्रपती शिवाजी महाराजांनी तुळजाभवानी देवीला दिलेले दागिने गहाळ; संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून चौकशीची मागणी

Posted by - July 25, 2023 0
कोल्हापूर : तुळजाभवानी मातेचे मौल्यवान अलंकार तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी तुळजाभवानी देवीला दिलेले आणि भाविकांनी वाहिलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तूंची मोजणी पूर्ण…

अधिसभा निवडणुकीसाठी विद्यापीठ प्रशासन सज्ज; निर्भिडपणे आणि जबाबदारीपूर्वक प्रक्रिया पार पाडण्याचे कुलगुरूंचे आवाहन

Posted by - November 16, 2022 0
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२२ रोजी मतदान होणार असून यासाठीची विद्यापीठाची तयारी अंतिम टप्प्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *