व्यक्तिविशेष : भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचा आज जन्मदिवस; ‘भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातिभेद पुरा, सेवाभाव धरा’ चा दिला होता नारा !

143 0

पंजाबराव देशमुख (जन्म : पापळ-अमरावती जिल्हा, २७ डिसेंबर १८९८; – दिल्ली, १० एप्रिल १९६५) यांचा जन्म पापळ या गावी झाला. उच्च शिक्षण घेऊन ते स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. इ.स. १९३६च्या निवडणुकीपश्चात ते शिक्षणमंत्री झाले. स्वतंत्र भारतात ते भारताचे कृषी मंत्री होते. विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली. या संस्थेच्या पश्चिम विदर्भात म्हणजे अमरावती विभागात अंदाजे १,००० च्या वर शाळा आहेत. महाविद्यालये, अभियांत्रिकी पदवी, तसेच पदविका तंत्रनिकेतन, कृषी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय अशी अनेक महाविद्यालये सुरू करून त्या संस्था शिक्षण क्षेत्रात फार मोठे योगदान देत आहेत.

‘भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातिभेद पुरा, सेवाभाव धरा’ हे पंजाबराव देशमुखांचे ब्रीदवाक्य होते.

पंजाबराव देशमुख यांच जन्म२७ डिसेंबर इ.स. १८९८ ला पापळ, अमरावती येथे झाला.
मृत्यू १० एप्रिल इ.स. १९६५
राजकीय पक्ष : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

संक्षिप्त जीवन
डॉ. पंजाबराव देशमुख ( भाऊसाहेब देशमुख)
मूळ आडनाव – कदम

१९२७- शेतकरी संघाच्या प्रचारासाठी ‘महाराष्ट्र केसरी’ हे वर्तमानपत्र चालविले.

वैदिक वाङ्मयातील धर्माचा उद्गम आणि विकास’ या प्रबंधाबद्दल डॉक्टरेट.

१९३३ – शेतकऱ्यांची कर्जातून मुक्तता करणारा कर्ज लवाद कायदा पारiत करण्यात मोठा वाटा. त्यामुळे त्यांना हिंदुस्थानच्या कृषक क्रांतीचे जनक म्हणतात.

१९२६ – मुष्टिफंड या माध्यमातून गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद छात्रालय काढले.

१९२७ – शेतकरी संघाची स्थापना.

१९३२ – श्री. ए. डब्ल्यू. पाटील यांच्या सहकार्याने श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना.

? – ग्रामोद्धार मंडळाची स्थापना.

१९५० – लोकविद्यापीठाची स्थापना (पुणे), त्याचे नंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात रूपांतर झाले.

१९५५ – भारत कृषक समाजाची स्थापना व त्याच्याच विद्यमाने ‘राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना.

१९५६ – अखिल भारतीय दलित संघाची स्थापना.

१८ ऑगस्ट १९२८ – अमरावती अंबाबाई मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून सत्याग्रह .

१९३० – प्रांतिक कायदे मंडळावर निवड. शिक्षण, कृषी, सहकार खात्याचे मंत्री

लोकसभेवर १९५२, १९५७, १९६२ तीन वेळा निवड.

१९५२ ते ६२ केंद्रीय मंत्रिमंडळात कृषिमंत्री. भारताचे पहिले कृषिमंत्री.

देवस्थानची संपत्ती सरकारने ताब्यात घेऊन विधायक कार्य करावे या उद्देशाने १९३२ मध्ये हिंदू देवस्थान संपत्ती बिल मांडले.

प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघाची स्थापना.

१९६० – दिल्ली येथे जागतिक कृषी प्रदर्शन भरवले.

Share This News

Related Post

Court Bail

Nagpur News : महिलेचा पाठलाग, शिवीगाळ करणं आणि ढकलणं हा विनयभंग होऊ शकत नाही; हायकोर्टाचा निर्णय

Posted by - January 5, 2024 0
नागपूर : विनयभंगाच्या गुन्हावर न्यायालयाने (Nagpur News) निकाल देताना काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहे. महिलेचा पाठलाग करणे, तिला शिवीगाळ करणे…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश

Posted by - March 4, 2022 0
पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पुणे शहर व जिल्ह्यात पॅराग्लायडींग, हॉट बलून इत्यादी उड्डाणांना बंदी…
Manoj Jarange

Manoj Jarange Patil : ‘आता माफी नाही’, भाजपच्या ‘या’ नेत्याने मनोज जरांगेंना दिला इशारा

Posted by - February 28, 2024 0
नागपूर : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे, सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं आहे, मात्र तरी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *