जनतेचे प्रश्न थेट संसदेत…!खासदार सुप्रिया सुळे यांचा लोकाभिमुख संसदीय कामकाजासाठी अभिनव उपक्रम

267 0

पुणे:जनतेचे प्रश्न संसदेत ठामपणे मांडण्यासाठीच जनता आपल्याला निवडून देत असते.याच विचारातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून केवळ एका क्लिकवर नागरिकांना आपले प्रश्न थेट संसदेत मांडता येणार आहेत.
सक्रिय सहभाग आणि संवाद,लोकाभिमुख संसदीय कामकाजासाठी सुप्रिया सुळे यांनी हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.या अंतर्गत नागरिकांना आपले प्रश्न,विषय,सूचना https://ask me.supriyasule.net या वेबसाईटच्या माध्यमातून थेट सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत पाठवता येणार आहेत.
वेबसाईट ओपन केल्यानंतर नागरिकांना एक फॉर्म भरावा लागतो.यामध्ये आपली माहिती आणि प्रश्न स्पष्टपणे लिहिल्यानंतर हे प्रश्न थेट सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत पोहोचला असल्याचा एक एसएमएस देखील नागरिकांना मिळणार आहे.यामध्ये नागरिक आणि स्वयंसेवी संस्था आपले प्रश्न विचारू शकतात.”त्यातील महत्त्वाचे मुद्दे,सूचना मी संसदेत मांडण्याचा प्रयत्न करेन.या थेट संवादाला आणखी मजबूत करण्यासाठी नागरिकांच्या अन्य काही सूचना असतील तर त्यांचेही स्वागत आहे”असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत

Share This News

Related Post

Maharashtra Highway

Maharashtra Highway : महाराष्ट्रात तयार होणार ‘हे’ 3 नवीन महामार्ग

Posted by - April 20, 2024 0
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध महामार्गांचा विकास होण्याच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) रस्ते बांधण्याचे काम…

शरद पवार यांनी नकार दिल्यास राष्ट्रपतीपदासाठी राजकीय परिघाबाहेरील उमेदवार निवडावा, शिवसेनेची भूमिका

Posted by - June 15, 2022 0
नवी दिल्ली- केंद्रातील सत्ताधारी भाजपाने लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवली असून सर्व विरोधकांनी राष्ट्रपतीपदासाठी सक्षम उमेदवार ठरवावा. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद…
CM EKNATH SHINDE

#CM EKNATH SHINDE : स्त्रीशक्तीचा आदर करूया, बरोबरीचे स्थान देऊया; जागतिक महिला दिनाच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Posted by - March 8, 2023 0
मुंबई : “स्त्रीशक्ती, मातृशक्ती ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. या शक्तीचा आदर करूया. त्यांना समानतेचे, बरोबरीचे स्थान देऊया,’ असे आवाहन…

नियम पाळून सण साजरे करण्यास परवानगी, राज्यात निर्बंध हळहळू शिथील

Posted by - March 30, 2022 0
मुंबई- राज्यात निर्बंध हळहळू शिथील करतोय, सणवार साजरे करताना काळजी घ्या, शिस्त पाळून सण साजरे करा, असे आवाहन राज्याचे आरोग्य…

BREAKING : इंदोरहून पुण्याला येणाऱ्या बसचा भीषण अपघात ; 12 प्रवाशांचा मृत्यू

Posted by - July 18, 2022 0
इंदोर; मध्य प्रदेश : मध्यप्रदेश मधील इंदोर मधून एक धक्कादायक माहिती समोर येते आहे. मध्य प्रदेश मधील धार जिल्ह्यात इंदोर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *