तीन मिनिटात 180 कोटीची विकासकामे मंजूर, पिंपरी महापालिका स्थायीचा पराक्रम

117 0

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने अवघ्या तीन मिनिटाच्या ऑनलाइन सभेत 180 कोटी रुपयांची विकासकामे मंजूर केली आहेत. निवडणूक निधी उभारण्यासाठी घाई गडबडीत विकासकामे मंजूर केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सदस्यांची मुदत 13 मार्च 2022 ला संपत असल्याने अगदी घाईघाईत विकास कामे मंजूर करण्याचा सपाटा महापालिकेतील सत्ताधारी भाजपने लावला आहे. यामध्ये महापालिका आयुक्त देखील मागे राहिलेले दिसत नाहीत. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी देखील 22 कोटी रुपयांचा निधी ऐनवेळी मंजूर करून घेतला आहे.

स्थायी समिती बैठक सुरू होत असताना फक्त 36 प्रस्ताव मंजुरीसाठी आले होते. मात्र, ऐनवेळी जवळपास 50 विकासकामाचे प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर ठेवण्यात आले. अशी एकूण 180 कोटी रुपयांची 86 विकासकामे स्थायी समितीने फक्त 30 मिनिटात मंजूर केली आहेत. स्थायी समितीच्या कामकाजावर सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक निधी उभा करण्यासाठी आणि कंत्राटदारांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी स्थायी समिती अतिशय घाईगडबडीत विकासकामे मंजूर करत आहे. असा आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला आहे.

Share This News

Related Post

अटीशर्थींचा भंग केल्यानं रघुनाथ कुचिक यांचा जामीन रद्द करा; चित्रा वाघ उद्या पुण्याच्या शिवाजीनगर पोलिसांत नोंदवणार जबाब

Posted by - May 1, 2022 0
शिवसेना नेते रघुनाथ कुचिकप्रकरणी भाजपा नेत्या चित्रा वाघ उद्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनला जाणार आहेत. कुचिक प्रकरणात चित्रा वाघ यांचा उद्या…
Pune Crime

Pune Crime : पुण्यातील बेपत्ता झालेल्या ‘त्या’ तरुणाचा साताऱ्यात छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला मृतदेह

Posted by - September 23, 2023 0
पुणे : रविवारपासून बेपत्ता असणाऱ्या पुण्यातील (Pune Crime) तरुणाचा मृतदेह साताऱ्यातील खंबाटकी बोगदाजवळ सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अत्यंत छिन्नविछिन्न…
Archana Patil

Archana Patil : अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी केले ‘हे’ वादग्रस्त वक्तव्य

Posted by - April 7, 2024 0
धाराशिव : धाराशिवच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) नव्या वादात सापडल्या आहेत. ज्या राष्ट्रवादी पक्षाने…
Mohan Agashe

Dr. Mohan Agashe : ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान

Posted by - July 23, 2023 0
पुणे : पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारा यंदाचा 2023 चा पुण्यभूषण पुरस्कार मराठी-हिंदी नाट्य-चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना…

भाजपा अंधेरी पोटनिवडणूक लढवणार नसल्यानं राज ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना आभार पत्र ,प्रिय मित्र देवेंद्रजी …

Posted by - October 17, 2022 0
रमेश लटके यांच्या निधनानंतर जाहीर झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक भाजपानं लढवू नये, अशी विनंती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *