पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहने लावण्यासाठी मोजावे लागणार पैसे

270 0

पुणे – पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांवर आता मोफत वाहने पार्क करता येणार नाहीत. याठिकाणी पे अँड पार्क योजना लागू करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय पुणे महापालिका प्रशासनाने घेतला आहे. याची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार आहे.

शहरात खासगी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढले असून पार्किंगचा प्रश्नही निर्माण होत आहे. पार्किंगसाठी शिस्त लागावी, नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त वापर करावा यादृष्टीने प्रशासनाने आता शहरातील प्रमुख रस्त्यांवर पे अँड पार्क योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. हे प्रमुख रस्ते कोणते असतील हे अद्याप निश्चित झाले नसले तरी याची अंमलबजावणी लवकरच केली जाईल असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

यासंदर्भात पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार आणि पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची बैठक पार पडली आहे. आयुक्त विक्रमकुमार म्हणाले, “शहरातील प्रमुख रस्त्यांवर पेन पार्क सुविधा चालू केला जाणार आहे. त्यासाठी पोलीस आयुक्तांशी चर्चा केली आहे. हे रस्ते कोणते असतील हे अद्याप ठरलेले नाही पण वाहतूक पोलिसांशी चर्चा करून लवकरच अंमलबजावणी सुरू केली जाईल.”

सत्ताधारी भाजपनेच मंजूर केले सशुल्क पार्किंग व्यवस्थेचे धोरण

महापालिकेत भाजपची सत्ता असताना शहरातील रस्त्यांवर सशुल्क पार्किंग व्यवस्था करण्याचे धोरण मंजूर झाले होते. त्यास सर्वसाधारण सभेची मान्यता मिळालेली होती. मात्र, नागरिकांच्या विरोधाला सामोरे जावे लागेल अशी शक्यता निर्माण झाल्याने हा प्रस्ताव तत्कालीन महापौरांच्या विचारासाठी पाठविण्यात आला होता. महापौर व पक्षनेत्यांच्या बैठकीत पे अँड पार्किंग साठी कुठले रस्ते निवडले जावेत यावर चर्चा होणार होती. पण हा निर्णय सर्वच पक्षांना अडचणीचा ठरणार असल्याने त्यावर निर्णय होऊ शकला नव्हता.

Share This News

Related Post

क्रिकेटर ते बिहारचे दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री; कशी आहे तेजस्वी यादव यांची राजकीय कारकीर्द

Posted by - August 10, 2022 0
पाटणा: भाजपासोबत फारकत घेत नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्या राजद बरोबर संसार थाटला असून नितीशकुमार यांनी आज आठव्यांदा मुख्यमंत्री पदाची…

‘अग्निपथ’च्या विरोधातील हिंसाचार राजकीय हेतुने- चंद्रकांत पाटील

Posted by - June 18, 2022 0
पुणे- लष्करात जाऊन देशाची सेवा करू इच्छिणारा तरूण कधीही देशाच्या संपत्तीचे नुकसान करू शकत नाही. अग्निपथ योजनेच्या विरोधात चाललेला हिंसाचार…

पुणेकरांना मिळकतकराच्या हजारो रुपयांच्या थकबाकीच्या नोटीस ; अन्यायपूर्ण कार्यवाहीचा आदेश निलंबित करा – संदीप खर्डेकर

Posted by - August 24, 2022 0
पुणे : पुणे महानगरपालिकेने मुख्य सभेने पारित केलेल्या ठराव क्रमांक 5, दिनांक ( 3-4-1970 ) च्या अनुषंगाने करपात्र रक्कम ठरविताना…

“फिर इधर खडकी मे दिखना मत,नही तो…!”दुचाकीची चक्कर मारायला दिली नाही म्हणून तरुणाला जबर मारहाण

Posted by - July 9, 2022 0
पुणे :”फिर इधर खडकी मे दिखना मत,नही तो तेरे को फिर से मारुंगा…!”अशी धमकी देऊन आरोपीने एका अल्पवयीन मुलाला जबर…

#BJP PUNE : संजय मयेकर यांची भाजप प्रदेश प्रवक्ते पदी नियुक्ती

Posted by - March 16, 2023 0
संजय मयेकर यांची महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्ती पत्र दिले. उपमुख्यमंत्री…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *