शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून संजय राऊतांना नारळ; खासदार गजानन कीर्तिकर यांची नव्याने नियुक्ती, वाचा सविस्तर

866 0

मुंबई : निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिल्यानंतर सर्व महत्त्वाच्या पदावरून ठाकरे गटाच्या नेत्यांची हकालपट्टी करण्याचं काम सध्या सुरू आहे. दरम्यान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती शिवसेनेच्या संसदीय नेते पदी करण्यात आली आहे. तर राज्यसभा खासदार संजय राऊत यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

याविषयी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना अधिकृत पत्र लिहून ही माहिती दिली आहे. दरम्यान नियुक्तीनंतर कीर्तीकर यांनी ट्विट करून शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

काही दिवसांपूर्वी संसदेतील पक्ष कार्यालयातून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो हटवून त्या जागी स्वर्गीय आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो लावण्यात आले होते. शिवसेनेतील बंडखोरीनंतर ठाकरे गटासोबत असलेले कीर्तीकर यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता ही मोठे जबाबदारी शिंदे गटाने कीर्तीकर यांच्यावर सोपवली आहे.

Share This News

Related Post

Vikas Lawande

Beed News : दोन्ही मुंडे कुटुंबीयांचं बीड जिल्ह्यातील नेमकं योगदान काय? राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांचा सवाल

Posted by - December 15, 2023 0
बीड : काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये (Beed News) फूट पडली. यामुळे पक्षात शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन…

Maharashtra Politics : “आज माइक ओढला,उद्या पॅन्ट ओढून ना…डं करतील !” संजय राऊत यांची पुन्हा एकदा कटू टीका

Posted by - July 15, 2022 0
महाराष्ट्र्र : आधी शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेऊन आघाडी सरकार स्थापन केले. आता राज्यातील ऐतिहासिक बंड होऊन एकनाथ शिंदे आणि देवेंद्र…

पुणेकरांसाठी महत्वाची माहिती : डेक्कन व चतु:श्रुंगी वाहतूक विभागाअंतर्गत वाहतूक, पार्कींग व्यवस्थेत बदल

Posted by - February 13, 2023 0
पुणे : पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत होण्याच्यादृष्टीने डेक्कन वाहतुक विभागाअंतर्गत चैत्राली को ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेड ते क्षितीज…

मानसिक आरोग्य : तुमचाही स्वभाव चिडचिडा झाला आहे? हे कारण असू शकतं, वेळेत करा आत्मपरीक्षण !

Posted by - December 21, 2022 0
मानसिक आरोग्य : अनेक जणांचा स्वभाव हा चिडचिडा असतो असं आपण म्हणतो. पण ते सत्य नाही. पुष्कळ वेळा एखाद्या व्यक्तीच…

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर भेट देऊन अभिवादन

Posted by - July 13, 2022 0
मुंबई : गुरुपौर्णिमेनिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील स्मृती स्थळावर भेट देऊन अभिवादन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *