पाकिस्तानमध्ये हिंदू मंदिराची तोडफोड झाल्याने भाविक भयभीत

275 0

कराची- पाकिस्तानमधील कराचीमध्ये एका हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवतांच्या मूर्तीं भंग करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भाविक भयभीत झाले आहेत. ही घटना ही घटना कराची शहरातील कोरंगी भागात घडली आहे. 

, जेथे श्री मारी माता मंदिरातील देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरू केला.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदू समुदायाच्या प्रार्थनास्थळांची तोडफोड करण्याचे हे ताजे प्रकरण आहे. कराची कोरंगी भागातील श्री मारी माता मंदिरात बुधवारी देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली. कोरंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारी मातेचे मंदिर आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मंदिराची पाहणी करून या प्रकरणाची चौकशी केली.

‘द एक्स्प्रेस ट्रिब्यून’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेमुळे कराचीतील हिंदू समुदायाचे लोक भयभीत झाले आहेत. ही घटना घडलेल्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या परिसरात राहणार्‍या हिंदू समाजातील लोकांनी सांगितले की, मोटारसायकलवरून आलेल्या सहा ते आठ जणांनी मंदिरावर हल्ला केला. हा हल्ला कोणी आणि का केला हे आम्हाला माहीत नाही, असे ते म्हणाले. पोलिसांना तक्रार नोंदवण्यास सांगितले आहे.

Share This News

Related Post

Bhajan Lal Sharma

Bhajan Lal Sharma : भजनलाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री

Posted by - December 12, 2023 0
राजस्थान : वृत्तसंस्था – भाजपने राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त केले होते. भाजपने छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या राज्यांचे मुख्यमंत्री…

संदीप देशपांडे यांच्या अडचणी वाढणार ! गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले चौकशीचे आदेश

Posted by - May 4, 2022 0
मुंबई – पोलिसांच्या हातावर तुरी देवून पळून जाणे मनसे नेते संदीप देशपांडे यांना महागात पडण्याचे चिन्ह आहेत. या प्रकरणी आता…

RBI ने ठोठावला 13 बँकांना दंड ! महाराष्ट्रातील ‘या’ बँकांवर होणार दंडात्मक कारवाई

Posted by - December 13, 2022 0
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील 13 कोर्पोरेटिव बँकांना नियमांचं पालन न केल्याने 50 हजार रुपयांपासून 4 लाखांपर्यंतचा दंड ठोठावला आहे.…

पुणे : राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेच्या सदस्यता नोंदणीचा शुभारंभ VIDEO

Posted by - August 25, 2022 0
पुणे : हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला असून, या भूमिकेचे पडसाद राज्यात उमटले होते राज ठाकरे यांचा नाशिक दौरा…

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या सर्व सदस्य आणि राज्यातील सर्व वीज कंत्राटी कामगार उतरणार आंदोलनात

Posted by - January 3, 2023 0
वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष समिती मधील सन्माननीय सदस्य संजय ठाकूर साहेब यांनी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष यांना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *