#PUNE : शिवाजी नगर व विश्रामबाग वाहतूक विभागाअंतर्गत पार्कींगबाबत आदेश निर्गमित

519 0

पुणे : पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत होण्याच्यादृष्टीने शिवाजीनगर वाहतूक विभाग आणि विश्रामबाग वाहतूक विभागांतर्गत पार्किंगबाबत काही अंतिम आदेश तर काही तात्पुरते आदेश पुणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने निर्गमित केले आहेत.

यापूर्वी मागविण्यात आलेल्या सूचना व हरकतींचा विचार करुन शिवाजीनगर वाहतूक विभागांतर्गत केदारनाथ मंदीराच्या संरक्षणभिंतीच्या उत्तरेकडील दरवाजा येथे ५० मीटर परिसर नो-पार्किंग करण्याबाबतचे अंतिम आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत. विश्रामबाग वाहतूक विभागाअंतर्गत गोविंद खरे चौक ते रमणबाग चौक दरम्यान पी-०१, पी-०२ पार्किंग तसेच भिडे पूल ते झेड पूल जंक्शन दरम्यान नो-पार्किंग करण्यात येत असल्याचे अंतिम आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

विश्रामबाग वाहतूक विभागाअंतर्गत गोगटे प्रशाला चौक ते सत्यभामा सोसायटी लगतच्या रोडला १५ मीटर पर्यंत नो-पार्किंग करण्याबाबतचे तात्पुरते आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. या तात्पुरत्या आदेशाबाबत नागरिकांनी आपल्या सूचना असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, बंगला क्रमांक ६, येरवडा टपाल कचेरीजवळ, पुणे-४११००६ येथे १५ मार्चपर्यंत लेखी स्वरुपात कळवाव्यात, असे पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.

अग्नीशमन वाहने, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हे आदेश लागू नसतील, असेही कळवण्यात आले आहे.

Share This News

Related Post

Sharad Pawar

Sharad Pawar : शरद पवारांना मोठा धक्का ! ‘या’ युवा नेत्याने घेतली प्रफुल्ल पटेल यांची भेट

Posted by - May 26, 2024 0
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची अनेक ज्येष्ठ नेत्यांनी साथ सोडली. यात राज्यातील…

Breaking ज्या पायरीवर पाडले त्याच पायरीवर किरीट सोमय्या यांचा झाला जंगी सत्कार

Posted by - February 11, 2022 0
पुणे- पुणे महापालिकेत शिवसेना कार्यकर्त्यांकडून झालेल्या धक्काबुक्कीनंतर किरीट सोमय्या ज्या पायरीवर पडले त्याच पायरीवर आज भाजप कार्यकर्त्यांनी सोमय्या यांचा सत्कार…

खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची विश्रांती

Posted by - July 8, 2022 0
पुणे: पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी मध्ये पावसाने आज विश्रांती घेतली आहे.८ जुलै पर्यंत चारही धरणांचा उपयुक्त पाणीसाठा ५.७१…
Mahadev App

Mahadev App : ‘महादेव अ‍ॅप’ प्रकरणात नवी अपडेट; मुंबई पोलिसांचं विशेष पथक स्थापन

Posted by - November 25, 2023 0
मुंबई : ‘महादेव अ‍ॅप’ (Mahadev App) प्रकरणी आता नवी माहिती समोर आली आहे. ‘महादेव अ‍ॅप’ तपासासाठी मुंबई पोलिसांचं विशेष पथक…
Suraj Mandhare

शिक्षण क्षेत्रात मोठा घोटाळा! 40 शिक्षण अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांचे ACB ला पत्र

Posted by - June 6, 2023 0
मुंबई : शिक्षण क्षेत्रातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. राज्यातील 40 शिक्षण अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे पत्र शिक्षण आयुक्त सूरज…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *