#Agriculture : राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाबाबत एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न

478 0

        राज्यात २ हजार ५५० नैसर्गिक शेती समूह स्थापन करण्यात येणार : कृषी आयुक्त सुनील चव्हाण

पुणे : राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान केंद्र व राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान योजनेच्या प्रचार प्रसिद्धी व जनजागृतीसाठी यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी (यशदा) येथे राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

या राष्ट्रीय कार्यशाळेत राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण, केंद्र शासनाच्या आय एन एम विभागाच्या सल्लागार डॉ. वंदना द्विवेदी, राष्ट्रीय सेंद्रिय व नैसर्गिक शेती केंद्राचे संचालक डॉक्टर गगनेश शर्मा, विभागीय सेंद्रिय व नैसर्गिक शेती केंद्राचे विभागीय संचालक अजय सिंग राजपूत, आत्माचे संचालक दशरथ तांभाळे, हरिधारा कृषी समितीचे संस्थापक मारुती माने उपस्थित होते.

कृषी आयुक्त सुनील चव्हाण म्हणाले, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत राज्यात २ हजार ५५० नैसर्गिक शेती समूह स्थापन करण्यात येणार असून राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी स्वेच्छेने नैसर्गिक, विषमुक्त शेतीकडे वळावे.

श्रीमती वंदना द्विवेदी यांनी राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान योजनेच्या मार्गदर्शक सूचनेबाबत सविस्तर माहिती देत सांगितले, एका ग्रामपंचायतीतील ५० हेक्‍टर क्षेत्राचा एक समूह करायचा असून या समूहातील शेतकऱ्यांना शेती शाळेमार्फत प्रशिक्षण, क्षेत्रीय भेटी आयोजित करण्यात याव्यात.

गगणेश शर्मा यांनी नैसर्गिक शेतीच्या प्रमाणीकरणाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. मध्यप्रदेश राज्यातील मारुती माने यांनी सेंद्रिय व नैसर्गिक शेती बाबत स्वतःचे अनुभव व्यक्त केले.

कार्यशाळेत नैसर्गिक शेती विषयक घडीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यशाळेस सर्व राज्यातील प्रकल्प उपसंचालक आत्मा, कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी, कृषी विज्ञान केंद्राचे प्रतिनिधी तसेच गोवा, तेलंगणा, दादरा नगर हवेली आदी राज्यातून अधिकारी कर्मचारी तसेच तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, शेतकरी उपस्थित होते.

Share This News

Related Post

Death

धक्कादायक! पाणी भरताना शॉक लागून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - June 2, 2023 0
अकोला : अकोला (Akola) जिह्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये हंडाभर पाणी भरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विजेचा धक्का…

नोटबंदी निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा ‘हा’ मोठा निर्णय, नोटबंदी विरोधातील सर्व याचिका फेटाळल्या; केंद्र सरकारला…

Posted by - January 2, 2023 0
नवी दिल्ली : 2016 मध्ये केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला होता. हा निर्णय होता नोटबंदीचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…

धक्कादायक ! शॉर्ट कपडे घातल्याच्या कारणातून पुण्यात काही तरुणींना मारहाण

Posted by - March 5, 2022 0
शॉर्ट कपडे घालून परिसरात फिरतात म्हणून पुण्यात काही तरुणींना चप्पलने मारहाण करण्यात आली आहे. हा धक्कादायक प्रकार खराडी येथील रक्षक…

विधानसभेत मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली; मुक्ता टिळक यांच्या निधनाने समाजाचे नुकसान – अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

Posted by - December 23, 2022 0
नागपूर : विधानसभा सदस्य मुक्ता टिळक यांच्या निधनाने केवळ एका पक्षाचेच नव्हे तर संपूर्ण समाजाचे नुकसान झाले आहे, अशा शब्दात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *