अरे बापरे ! मोक्कातील आरोपीला लॉकअप बाहेर काढून आरोपी पलायन करण्यास मदत केल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे निलंबन

5942 0

पुणे : सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी एका पोलीस कर्मचाऱ्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे तडकाफडकी निलंबन केले आहे. मिळालेल्या धक्कादायक माहितीनुसार वरिष्ठांची कोणतीही परवानगी न घेता मोक्कातील आरोपीला लॉकअप बाहेर काढून घर झडती घेण्यासाठी म्हणून घेऊन जात असताना आरोपी पलायन करण्यास मदत केल्याचा ठपका ठेवून या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास झुंबर मुंडे आणि पोलीस नाईक महेश राजेंद्र जाधव अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहेत. काही दिवसांपूर्वी मार्केट यार्ड येथील आंगडिया कार्यालयात शिरून अविनाश गुप्ता आणि त्याच्या टोळीने गोळीबार केला होता. त्यानंतर 28 लाख रुपये लुटून नेले होते. यातील आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. तसेच त्यांच्यावर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली होती.

रामदास मुंडे आणि महेश जाधव यांनी यातील नऊ आरोपींपैकी संतोष पवार आणि साई कुंभार यांना वरिष्ठांची कोणतीही परवानगी न घेता पोलीस कोठडीतून बाहेर काढले. त्यानंतर घराची झाडाझडती घेण्यासाठी खानापूर येथे घेऊन जात असताना संतोष पवार हा पळून गेला. यावेळी कोणताही पुरेपूर पोलीस बंदोबस्त न घेता पोलीस कर्तव्यात जबाबदार आणि बेफिकीर गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवून सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या दोघांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

Share This News

Related Post

12 व्या छात्र संसदेचे दिमाखदार उद्घाटन ; विद्यापीठांमधील विद्यार्थी निवडणुका सुरू व्हाव्यात ; केंद्रीय कायदा व न्यायमंत्री प्रा. एस.पी.सिंग बघेल यांची अपेक्षा

Posted by - September 15, 2022 0
पुणे : विद्यापीठे आणि शिक्षण संस्थांमधील स्थगित असलेल्या विद्यार्थी निवडणुका पुन्हा सुरू झाल्या पाहिजेत. देशातील सद्यकालीन राजकीय प्रवाह एका स्थित्यंतरातून…

धक्कादायक ! शॉर्ट कपडे घातल्याच्या कारणातून पुण्यात काही तरुणींना मारहाण

Posted by - March 5, 2022 0
शॉर्ट कपडे घालून परिसरात फिरतात म्हणून पुण्यात काही तरुणींना चप्पलने मारहाण करण्यात आली आहे. हा धक्कादायक प्रकार खराडी येथील रक्षक…

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 : विजयादशमी निमित्त खोखो खेळाडू संघांनी लुटले सुवर्ण ! खोखो स्पर्धेत महाराष्ट्राचा गोल्डन धमाका

Posted by - October 4, 2022 0
अहमदाबाद : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष संघांनी दस-याच्या पू्र्वसंध्येला सुवर्णपदक जिंकून विजयादशमीचे सोने लुटले. दोन्ही गटात निविर्वाद…

ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांची प्रकृती खालावल्यानं व्हेंटिलेटरवर

Posted by - February 5, 2022 0
गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली आहे. यामुळे त्यांनी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून पुन्हा त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती…

बीडमध्ये डोळ्यादेखत कोसळली चार मजली इमारत, वेळीच बाहेर पडल्याने वाचले रहिवाशांचे प्राण (व्हिडिओ)

Posted by - June 8, 2022 0
बीड- बीड शहरात चार मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने या इमारतीमधील रहिवाशांना वेळीच बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *