महाविकास आघाडी सरकारनं ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला – चंद्रकांत पाटील

326 0

कोल्हापुर- ओबीसींच्या आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या आदेशामुळे स्पष्ट झाले असून शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने ओबीसींची फसवणूक केली असून पाठीत खंजीर खुपसला आहे अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

तसेच आगामी निवडणुकीत भारतीय जनता पार्टी मात्र २७ टक्के तिकिटे ओबीसींना देऊन या समाजाला न्याय देईल, अशी ग्वाही देखील पाटील यांनी यावेळी दिली ते कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होईल. भाजपा निवडणुकीसाठी सदैव सज्ज असून आम्ही निवडणूक लढवू आणि त्यामध्ये भाजपाची उमेदवारी देताना प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेत एकूण जागांपैकी २७ टक्के जागांवर ओबीसींना तिकिटे देऊन भाजपातर्फे या समाजाला न्याय देऊ.

Share This News

Related Post

इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे चूल पेटवा आंदोलन

Posted by - March 24, 2022 0
पुणे- केंद्र सरकार अन्यायकारक पद्धतीने करत असलेल्या इंधन व डिझेल दरवाढीच्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बालगंधर्व चौकात चूल…

नवले पूल अपघात प्रकरणी ट्रक चालक अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Posted by - November 22, 2022 0
पुणे : नवले पूल येथे अपघातात फरार झालेल्या चालकाला सिंहगड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मनिराम यादव असे अटक करण्यात…

EWS आरक्षण हा बौद्धिकदृष्ट्या भ्रष्ट निर्णय, मागच्या दाराने मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न : ॲड. प्रकाश आंबेडकर

Posted by - November 8, 2022 0
EWS आरक्षणावरती सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. हा निकाल पाहता हा वैचारिक भ्रष्टाचार आहे असेच याबद्दल म्हणता येईल. मागच्या दाराने पुन्हा…

Rohit Pawar : रोहित पवारांना मोठा धक्का ! कन्नड सहकारी साखर कारखान्यावर ईडीची जप्ती

Posted by - March 8, 2024 0
छत्रपती संभाजीनगर : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. रोहित पवार (Rohit Pawar) यांचा बारामती अ‍ॅग्रो कंपनीने खरेदी…

Breaking News : भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली, ४० ते ५० रहिवाशी अडकल्याची भीती

Posted by - April 29, 2023 0
भिवंडीतील वलपाडा येथे एक तीन मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत ४० ते ५० रहिवाशी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *