ग्रामपंचायत निवडणुकांसाठी 2 डिसेंबरपर्यंत ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा

225 0

पुणे : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा दिली; तसेच नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत २ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत वाढविली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ९ नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार २८ नोव्हेंबर २०२२ ते २ डिसेंबर २०२२ (दुपारी ३ वाजेपर्यंत) या कालावधीत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यात आता अंशत: दुरूस्ती करून नामनिर्देशनपत्र पारंपरिक (ऑफलाईन) पद्धतीने २ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत सादर करता येतील असे राज्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस. मदान यांच्या आदेशानुसार स्पष्ट करण्यात आले आहे.

Share This News

Related Post

Kirit somayya

किरीट सोमय्या हाजीर हो ! आर्थिक गुन्हे विभागात चौकशीसाठी हजर राहणार

Posted by - April 18, 2022 0
मुंबई- आयएनएस विक्रांत निधी अपहार प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या आज आर्थिक गुन्हे विभागात चौकशीसाठी हजर होणार आहेत. या प्रकरणी…
Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा समाज पुन्हा आक्रमक; ‘या’ दिवशी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक

Posted by - February 11, 2024 0
जालना : आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा…

सिंहगडाचा श्वास मोकळा : किल्ले सिंहगडावर पुणे विभागाची अतिक्रमण निर्मूलन कारवाई

Posted by - November 18, 2022 0
पुणे : शुक्रवारी पहाटेपासून किल्ले सिंहगडावर पुणे वनविभागाने अतिक्रमण निर्मूलन कारवाईला सुरुवात केली आहे.  सिंहगडाचे ऐतिहासिक महत्त्व तसेच गडाचे सौंदर्य…

आष्टी-अहमदनगर रेल्वे मार्गाची सर्व तयारी पूर्ण ; 23 सप्टेंबरला होणार लोकार्पण

Posted by - September 13, 2022 0
अहमदनगर : आष्टी-अहमदनगर रेल्वेचे संपूर्ण कामकाज पूर्ण झाले आहे. रेल्वेची ट्रायल देखील घेण्यात आली. येत्या 23 सप्टेंबरला आष्टी अहमदनगर रेल्वेचे…

TOP NEWS SPECIAL REPORT : हिवाळी अधिवेशनाची भरकटलेली ‘दिशा’

Posted by - December 31, 2022 0
राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचं अखेरीस सूप वाजलं कोरोनामुळं तब्बल दोन वर्ष नागपुरात होऊ न शकलेलं हिवाळी अधिवेशन यंदा या दोन वर्षाच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *