मुंबई : आपत्ती व्यवस्थापन संचालकपदासाठी अधिकारी मिळेना; 7 महिन्यांपासून पद रिक्त

211 0

मुंबई: राज्यातील कोणत्याही विभागात, जिल्हयात कसलीही आपत्ती आली तर त्या ठिकाणी तातड़ीने मदत पोहचिण्याचे, त्यासाठी संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधण्याचे काम राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन संचालनालयाकडून होते. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्हयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क ठेवणे, त्यांना आवश्यक मदत पुरविणे, राज्य सरकारला आपत्तीची माहिती देणे, केंद्राशी समन्वय ठेवणे आदी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या संचालकांना सांभाळाव्या लागतात. शिवाय राज्याचा मुख्य नियंत्रण कक्षही याच संचालनालयात कार्यरत आहे.                                                                                                                                                राज्यातील नैसर्गिक आपत्तीवर लक्ष ठेवून वेळीच मदतकार्य पोहोचविण्यात महत्त्वाचा दुवा म्हणून काम करणारा राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचा कारभारच गेल्या सात महिन्यांपासून संचालकाविना सुरू असल्याची धक्कादाक बाब समोर आली आहे. या महत्त्वाच्या पदावरील एल.एस माळी यांच्या बदलीनंतर २१ डिसेंबरपासून संचालनालयाचा कारभार अतिरिक्त कार्यभारावर सुरू आहे.                                       गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस सुरू असून अनेक जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मान्सून काळात तर आपत्ती व्यवस्थापन विभागावर अधिक जबाबादारी असते. मात्र या विभागाची धुरा ज्यांच्यावर असते. त्या संचालकपदासाठी सात महिन्यांनंतरही सरकारला योग्य अधिकारी मिळालेला नाही. या संचालनालयाचे संचालक एल.एस.माळी यांची २१ डिसेंबर२०२१ रोजी शुल्क नियमन प्राधिकरणाचे सचिव म्हणून बदली झाल्यानंतर त्यांच्या ठिकाणी राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक सी.एल. पुलकुंडवार यांची नियु्क्ती करण्यात आली. मात्र त्यावेळी सार्वजनिक उपक्रम खाते सांभाळणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्याच आग्रहामुळे पुलकुंडवार यांनी आपत्ती व्यवस्थापन संचालकपदी रुजू न होता एमएसआरडीसीतच राहणे पसंद केले.                                              तेव्हापासून संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार तात्पुरत्या स्वरूपात गेल्या सात महिन्यांपासून मदत व पुनर्वसन विभागाचे उपचिव संजय धारूरकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. विशेष म्हणजे धारूरकर यांच्याकडेच सहसचिव व वित्तीय सल्लागार पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात सनदी सेवेतील सुमारे ३०० अधिकारी असूनही महत्त्वाच्या आपत्ती व्यवस्थापन संचालकपदासाठी अधिकारी मिळेनात याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

Share This News

Related Post

धक्कादायक : अहमदनगरमध्ये वाळू तस्करी करणाऱ्या डंपरने पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चिरडण्याचा केला प्रयत्न; फिल्मी थरार, सुदैवाने वेळेत ….

Posted by - December 23, 2022 0
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाळूची तस्करी करणाऱ्या डंपरने पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना…

उद्या 1 वाजता लागणार दहावीचा निकाल; कुठे आणि कसा पाहाल निकाल?

Posted by - June 1, 2023 0
मुंबई : दहावीच्या निकालासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. उद्या 2 जून रोजी 1 वाजता निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र…

गिरवली बस दुर्घटनेतील जखमी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून विचारपूस

Posted by - September 29, 2022 0
पुणे : आंबेगाव तालुक्यात गिरवली येथील बस दुर्घटनेतील जखमी विद्यार्थ्यांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळी साईनाथ रुग्णालयात भेट घेऊन…
Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार अवकाळी पाऊस; आयएमडीने दिला इशारा

Posted by - February 10, 2024 0
मुंबई : महाराष्ट्रात काही भागात अजूनही थंडीचा जोर कायम (Maharashtra Weather Update) असला तरी देखील राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान विभागाकडून…

अहमदनगरमध्ये बारावी गणिताचा पेपर तासभर आधीच मुलांना वाटला ! नक्की काय घडलं, वाचा सविस्तर

Posted by - March 15, 2023 0
अहमदनगर : अहमदनगरमधून एक धक्कादायक घटना समोर येते. अहमदनगर मधील एका महाविद्यालयामध्ये बारावी गणिताचा पेपर हा तासभर आधीच विद्यार्थ्यांना मिळाला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *