पुणे रेल्वे स्टेशनवरील संशयास्पद वस्तू स्फोटक नसल्याचा प्राथमिक अंदाज

578 0

पुणे – पुणे रेल्वे स्टेशनवर आढळलेली संशयास्पद वस्तू ही स्फोटक नसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. बॉम्ब शोधक नाशक पथकाने तपासणी केली असता ही संशयास्पद वस्तू स्फोटक नसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

रेल्वे स्टेशनमध्ये सकाळी साडेदहाच्या सुमारास बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. खबर मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खबरदारी म्हणून प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 पूर्णपणे रिकामे करण्यात आले होते. इतकंच नाही तर काही काळासाठी रेल्वे वाहतूक देखील थांबवण्यात आली होती.

बॉम्ब शोधक नाशक पथकाने सापडलेली बॉंब सदृश्य वस्तू काळजीपूर्वक घेऊन पुणे रेल्वे स्टेशनजवळील मैदानावर नेण्यात आली. त्याठिकाणी तपासणी केली असता ही संशयास्पद वस्तू स्फोटक नसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

“सापडलेली वस्तू ही जिलेटीन नव्हती. कोणीतरी जाता जाता ती वस्तू सोडून गेले असावेत. ही वस्तू फटाक्यांसारखी होती, पण ती मोकळी त्यात फक्त वायर होत्या,” अशी माहिती देण्यात आली. या घटनेनंतर तासाभराने पुणे रेल्वे स्टेशवरील वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे.

 

 

Share This News

Related Post

शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात काँग्रेसचं आंदोलन

Posted by - April 10, 2022 0
देशाचे नेते आदरणीय खा. शरदचं पवारसाहेब यांच्या मुंबई येथील निवासस्थानी महाराष्ट्राच्या झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यासाठी काँग्रेस पार्टीच्या वतीने…

पुण्यात भीषण हत्याकांड : तरुणावर केले चाकूचे 35 वार ; पेव्हर ब्लॉक डोक्यात घालून हत्या …

Posted by - July 27, 2022 0
पुणे : पुण्यात नाना पेठमध्ये एका तरुणाची भयंकर पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. या तरुणावर 35 वेळा चाकूने वार केले…
NIA

पुण्यानंतर आता महाराष्ट्रातील ‘या’ महत्त्वाच्या शहरांमधून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना अटक

Posted by - September 27, 2022 0
महाराष्ट्र : राष्ट्रीय तपास संस्थेने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या विरोधात जोरदार कारवाईचा बडगा उगारला आहे. दरम्यान नाशिक आणि पुण्यातील PFI…
Khandve

पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांना न्यायाधीशांना धमकावल्या प्रकरणी अटक

Posted by - June 4, 2023 0
गडचिरोली : आपल्या विरोधात आदेश दिल्याच्या रागातून न्यायाधीशांच्या घरी जाऊन त्यांच्याशी हुज्जत घातल्याप्रकरणी वादग्रस्त पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांना गडचिरोली…
Navneet Rana And Uddhav Thakery

ठाकरे गटाचा मास्टरप्लॅन ! नवनीत राणांविरोधात लोकसभा लढवणार ‘ही’ वाघीण?

Posted by - May 17, 2023 0
मुंबई : आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे गट आणि भाजपला जोरदार टक्कर देण्यासाठी ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *