‘माझ्या घरासमोरचा अवघ्या दोन किमीचा रस्ता पूर्ण करू शकलो नाही’, नितीन गडकरी असे का म्हणाले ?

141 0

नागपूर- एवढे महाकाय प्रकल्प पूर्ण करताना माझ्या घरासमोरचा अवघ्या दोन किमीचा रस्ता पूर्ण करू शकलो नाही अशी खंत केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. नागपुरात सरिता कौशिक यांच्या “बेटर दॅन द ड्रीम.. अ पीपल्स स्टोरी” या पुस्तकच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

देशात हजारो किलोमीटरचे उत्कृष्ट महामार्ग बांधणारे मंत्री आपल्या घरासमोरचा दोन किलोमीटरचा रस्ता अद्याप बंधू शकलेले नाहीत. या कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, एवढं महाकाय प्रकल्प पूर्ण करताना माझ्या घरासमोरचा अवघ्या दोन किमीचा रस्ता पूर्ण करू शकलो नाही असे गडकरी म्हणाले. अवघ्या दोन किमीचा रस्ता बांधताना लोकांच्या सततच्या तक्रारींमुळे गेले अनेक वर्ष घरासमोरचा रस्ता पूर्ण होऊ शकला नाही.

लोकं किती तक्रारी करतात आणि न्यायालय ही त्यांच्यावर निर्णय देताना किती कालावधी लावतो याचा विचार होण्याची गरज आहे. माझ्या घरासमोरचा रस्ता पूर्ण न झाल्यामुळे मी गेले सहा वर्ष माझ्या जन्मस्थान असलेल्या महालात राहत नाहीये अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. आता महालातला तो रस्ता पूर्ण करू शकत नसल्यामुळे इतर दोन रस्त्यांचे काम सुरु करण्याचे ठरवले आहे असे गडकरी यांनी सांगितले.

Share This News

Related Post

माझ्यावर आरोप करणारी महिला दाऊद गँगशी संबंधित; शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांचा धक्कादायक आरोप

Posted by - December 25, 2022 0
माझ्यावर आरोप करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. पैशांसाठी मला तिने ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे वक्तव्य शिंदे गटाचे खासदार राहुल…
School

World’s Best School : जगातील टॉप 10 स्कूलमध्ये महाराष्ट्रातल्या ‘या’ 3 शाळांचा समावेश

Posted by - June 16, 2023 0
2023 चे जगातील सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कार जाहीर झाले आहेत. यावर्षी भारताच्या पाच शाळांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. यामध्ये दिल्ली,…

भर व्यासपीठावरून शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या खिशातून 50 हजारांचे बंडल लांबवले

Posted by - March 30, 2022 0
सांगली – ओबीसी मेळाव्यादरम्यान भर व्यासपीठावर गर्दीचा फायदा घेऊन एका चोराने शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या खिशातून 50 हजार रुपयांच्या नोटांचं बंडल…

लिफ्टमध्ये अडकलेल्या महिलेची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका

Posted by - April 27, 2022 0
आज दुपारी चार वाजता बाजीराव रस्ता, चंद्रमोहन सोसायटीत अचानक विद्युतप्रवाह बंद झाल्याने पाच मजली असणारया इमारतीत दुसरया मजल्यावर लिफ्टमध्ये असणारी…

भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांची नियुक्ती

Posted by - May 12, 2022 0
नवी दिल्ली- भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजीव कुमार हे 15 मे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *