NITIN GADAKARI : चांदणी चौकातील उड्डाणपूल पुढील दोन ते तीन दिवसांत पाडणार

333 0

पुणे : चांदणी चौक भागात सातत्याने वाहतूक कोंडीचा सामाना नागरिकांना करावा लागत असल्याचे पुढे आले आहे. याच वाहतूक कोंडीमुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील अडकले होते. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी देखील याची दखल घेतली आहे.

आज पुणे दौऱ्यावर असलेल्या मंत्री गडकरींनी चांदणी चौकातील उड्डाणपुल पुढील दोन तीन दिवसात पाडणार असल्याचे पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. गडकरींनी पुण्यातील वाहतूकचा प्रश्न सोडवण्यासाठी बैठक बोलवली होती. पुणे विभागातील रस्ते विकास योजनांचा आढावा घेतला.

या पत्रकार परिषदेला भाजपचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ,आमदार माधुरी मिसाळ उपस्थित होते. याबरोबर पुणे ते शिरूर आणि नगर, औरंगाबाद या जुन्या रोडवर तीन मजली रस्ताच्या डिझाईनचं काम चालू आहे. त्याचबरोबर तळेगाव ते शिरूर हा मार्ग करण्याचं काम चालू आहे. त्यामुळे मुंबईकडून येणारे वाहने वळवता येतील असंही ते म्हणाले. तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि पुणे-शिरूर-नगर या रस्त्याचेही आराखडे बनवण्याचं काम सुरू आहे. असं गडकरी म्हणाले आहेत.

Share This News

Related Post

Ajit Pawar

Pune Metro : मेट्रोसंदर्भात पुणेकरांनी अजित पवार यांच्याकडे केलेली ‘ती’ मागणी मान्य

Posted by - August 14, 2023 0
पुणे : पुणे शहरातील नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीच्या एक, एक सुविधा मिळत आहे. 1 ऑगस्टपासून पुणे शहरातील मेट्रोचे (Pune Metro) दोन…
Pune News

Pune Porsche Accident : ‘त्या’ आरोपी मुलामुळे ‘या’ आमदाराच्या मुलाने सोडली होती शाळा

Posted by - May 22, 2024 0
पुणे : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या पोर्शे अपघात प्रकरणामध्ये (Pune Porsche Accident) आता पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. आतापर्यंत या प्रकरणी…

“शिंदे साहेब भाजपची जनमानसातील उरलीसुरली लोकप्रियता संपवतील”;अमोल मिटकरींनी भाजपला पुन्हा डीवचले…

Posted by - July 10, 2022 0
मुंबई:शिवसेनेमध्ये आलेला भूकंप,एकनाथ शिंदे यांनी केलेली बंडखोरी आणि त्यानंतर सत्ता स्थापनेच्या भाजपच्या वेगवान हालचाली यावर राजकीय आणि जनमानसातून देखील वेगवेगळ्या…

अखेर पोलीस महासंचालकपदाची माळ रश्मी शुक्लांच्या गळ्यात; ठरल्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक

Posted by - January 4, 2024 0
राज्याच्या पोलिस महासंचालक पदी अखेर रश्मी शुक्ला यांची निवड झाली आहे. राज्याचे माजी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची निवृत्तीनंतर  शुक्ला…

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यास भाजप बरोबर जाणार का ? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले..

Posted by - June 21, 2022 0
नवी दिल्ली- शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांना घेऊन बंड पुकारले आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *