नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला, अटकेची टांगती तलवार

145 0

सिंधुदुर्ग – सतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंना सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे, त्यामुळे नितेश राणेंच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

सतोष परब हल्ला प्रकरणात वॉरंट निघाल्यानंतर नितेश राणेंनी अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली तिथे त्यांचा जामीन फेटाळला, त्यानंतर नितेश राणे यांनी हायकोर्टात धाव घेतली तिथे देखील त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर राणें यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. या ठिकाणी देखील त्यांच्या पदरी निराशा पडली. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना हा दिवस अटकेपासून संरक्षण देत पुन्हा सत्र न्यायालयात दाद मागण्याची सूचना केली. सिधुदुर्ग सत्र न्यायालयात राणेंच्या जामीन अर्जावर काल आणि आज सुनावणी पार पडली. आज या प्रकरणाचा निकाल देत न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे नितेश राणेंच्या अटकेवर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान, नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. परब यांना 4 फेब्रुवारी पर्यंतची न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

नितेश राणेंचा जामीन कोर्टाने फेटाळल्यानंतर सिंधुदुर्ग न्यायालयासमोर नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या. राणेंंना जामीन फेटाळल्यानंतर भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. यावेळी माजी खासदार निलेश राणे हेही आक्रमक पवित्रा घेताना दिसून आले. जामीन फेटाळल्यानंतर निलेश राणे आणि पोलिसांत बाचाबाची झाली. मला कायदा शिकवू नका अशी आक्रमक प्रतिक्रिया निलेश राणे यांनी दिली आहे. पोलिसांनी गाडी थांबवल्यानंतर नितेश राणे गाडीतून खाली उतरले आणि न्यायालयात गेले. त्याआधी त्यांनी त्यांच्या वकिलांशीही चर्चा केली.

Share This News

Related Post

Manisha Kayande

Manisha kayande : शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच मनिषा कायंदेकडे सोपवण्यात आली ‘ही’ जबाबदारी

Posted by - June 19, 2023 0
मुंबई : आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. पण वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या आमदार…

ॲड. रुपाली पाटील ठोंबरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी निवड

Posted by - May 31, 2022 0
राष्ट्रवादीच्या नेत्या ॲड. रुपाली पाटील ठोंबरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मनसेला…

मंगळवार ३१ जानेवारी २०२३ रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय

Posted by - January 31, 2023 0
महाराष्ट्राला मिळाले राज्यगीत. ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताचा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकार. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या…

देशातला या शाही सोहळ्यासाठी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि सलमान खान सारख्या 4000 VVIP निमंत्रित; कुणाचा आहे हा शाही सोहळा ? वाचा

Posted by - March 11, 2023 0
हरियाणा : देशातल्या एका शाही सोहळ्याची जय्यत तयारी हरियाणामध्ये सुरू आहे. तर हे लग्न आहे हरियाणातील सत्ताधारी पक्षातील सहकारी जननायक…

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाचे “लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई विमानतळ” नामकरण

Posted by - July 16, 2022 0
नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाचे “लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई विमानतळ”असे नामकरण करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *