राजगडावर रात्रीच्या मुक्कामास बंदी; राजगडाचे पावित्र्य भंग करणाऱ्या पर्यटकांवर होणार दंडात्मक कारवाई

847 0

राजगड : राजगड किल्ला या राज्य संरक्षित स्मारकाच्या संरक्षित क्षेत्रात रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात पर्यटक मुक्कामी राहत असल्याने तिथेच जेवण बनवले जाते. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कचरा किल्ल्यावरच फेकून दिला जातो आहे. महत्त्वाच्या वास्तूंच्या आडोशास शौचास बसत असल्यामुळे या सर्व बाबींमुळे किल्ल्यावर घाणीचं आणि दुर्गंधीच साम्राज्य वाढत असल्यामुळे, तसेच स्मारकाच्या पावित्र्याला धोका पोहोचल्याने या स्मारकाच्या संरक्षित क्षेत्रात रात्रीच्या वेळेस पर्यटकांना मुक्कामी राहण्यास बंदी घालण्यात आली आहे.

आता ओला, उबेरला देखील लागणार प्रवासी वाहतुकीचा पक्का परवाना, अन्यथा…

महाराष्ट्र प्राचीन स्मारके आणि पुराण वस्तू शास्त्रविषयक स्थळे आणि अवशेष नियम 1962 मधील नियम क्रमांक चार नुसार एखाद्या संरक्षित स्मारकाचा कोणताही विशिष्ट भाग हा पुराण वास्तुशास्त्र अधिकारी त्याचे अभिकर्ते त्यांचा हाताखालील इसम आणि कामगार आणि अशा भागात कामावर असलेला कोणताही इतर सरकारी सेवक यांच्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही समाजासाठी कायमचा किंवा एखाद्या विशिष्ट मुदतीसाठी खुला असणार नाही.

त्यामुळे यापुढे जर कोणीही व्यक्तीने उपबंधाचे उल्लंघन केले तर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

Share This News

Related Post

जालना येथून बेपत्ता झालेले पोलीस निरीक्षक संग्राम ताटे शिरवळमध्ये बेशुद्धावस्थेत सापडले

Posted by - February 14, 2022 0
जालना- तब्बल 13 दिवसांपूर्वी जालना येथून बेपत्ता झालेले जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संग्राम ताटे शिरवळ येथे सापडले…

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Posted by - February 2, 2022 0
मुंबई- मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले आहे. मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या…

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक आम्ही जिंकूच ! – चंद्रशेखर बावनकुळे

Posted by - October 14, 2022 0
मुंबई : अंधेरी पूर्व पोट निवडणुकीत शिंदे गट आणि ठाकरे गट पहिल्यांदाच भिडणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक आता दोन्हीही गटांसाठी…
LIC

LIC कडून बालासोर दुर्घटनेतील पीडितांसाठी जाहीर केल्या अनेक सवलती

Posted by - June 4, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय आयुर्विमा म्हणजेच एलआयसीने (LIC) शनिवारी रात्री सांगितले की, ओडिशाच्या बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या…

‘बाळासाहेब असते तर त्यांनी काय केले असते…. ‘, शरद पवार यांनी उघड केले महाविकास आघाडी सरकारच्या निर्मितीचे गुपित

Posted by - June 4, 2022 0
पुणे – महाविकास आघाडीचा प्रयोग बाळासाहेब ठाकरे यांना आवडला असता. जेंव्हा राजकीय क्रायसिस निर्माण होतो, त्यावेळेला बाळासाहेब असते तर त्यांनी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *