आनंदाची बातमी ! नीट परीक्षेची तारीख पुढे ढकलली, तारीख कोणती ते जाणून घ्या

348 0

नवी दिल्ली- देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश (NEET UG 2022) नोंदणीची अंतिम तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे. ही तारीख 15 मे वरून 20 मे 2022 करण्यात आलेली आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) तर्फे ही परीक्षा घेतली जाते. विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी असून अद्याप नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांनी त्वरित neet.nta.nic.in अधिकृत वेबसाईटला भेट देऊन स्वत:ची नोंदणी करू शकता. यावेळी एनईईटी यूजी 17 जुलै 2022 रोजी होणार आहे. यापूर्वी, एनईईटी यूजीसाठी नोंदणीची अंतिम तारीख 6 मे होती, जी 15 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता हीच तारीख 20 मे २०२२ रात्री 9 वाजेपर्यंत करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या परीक्षेसाठी अर्ज शुल्क भरण्याची मुदत 20 मे 2022 च्या रात्री 11.50 पर्यंत आहे. देशातील विविध शहरांमध्ये ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

अशी नोंदणी करा

सर्वप्रथम उमेदवारांना neet.nta.nic.in अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे.
वेबसाइटच्या होम पेजवर त्यांना एनईईटी यूजी 2022 च्या नोंदणीची लिंक मिळेल, ज्यावर क्लिक करावे लागेल.
आता तुमच्यासमोर नोंदणी करण्याचा पर्याय उपलब्ध असेल. त्यावर तुम्ही तपशील टाका. यानंतर लॉग इन करण्यासाठी पासवर्ड आणि रजिस्ट्रेशन नंबर मिळेल.
आता तुमच्या क्रेडेन्शियल्समधून लॉग इन करा आणि नंतर अर्ज भरा. त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा.
शेवटी अर्ज शुल्क जमा करा आणि फॉर्म फायनल सबमिट करा. त्याची प्रिंट काढून सोबत ठेवा.

Share This News

Related Post

‘आरटीई’ साठी सोमवारपासून शाळा नोंदणी सुरू; आरटीई अंतर्गत 25% जागा दुर्बल घटकांसाठी राखीव ! कोणकोणती कागदपत्रं आवश्यक ?

Posted by - January 21, 2023 0
शिक्षणहक्क कायद्याअंतर्गत राज्यातील खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव असणाऱ्या 25% जागांसाठीची शाळा नोंदणीची प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून सुरू होत आहे. 23…

रशिया-युक्रेन युद्ध : खारकीव्हमध्ये झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

Posted by - March 1, 2022 0
युक्रेनमधील खारकीव शहरात रशियानं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी ऑपरेशन गंगा…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘तीन’ दैवी तलवारींचा इतिहास; त्या सध्या कुठे आहेत ?

Posted by - November 15, 2022 0
ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे ऋषी सुनक विराजमान झाल्यानंतर ब्रिटीश राजघराण्याच्या संग्रहात असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा नावाची रत्नजडित तलवार महाराष्ट्राला…
Sameer Wankhede

माझ्यावरही अतिक अहमदसारखा हल्ला होऊ शकतो; वानखेडेंची पोलिसांकडे सुरक्षेची मागणी

Posted by - May 22, 2023 0
मुंबई : एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे (Former Director of NCB Sameer Wankhede) यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.…

पुणेरी दणका : रस्त्यावर कराल घाण तर करावी लागेल साफ ! थुंकी साफ करतानाचा व्हिडिओ पुणे मनपाकडून व्हायरल

Posted by - January 14, 2023 0
पुणे : पुण्यात G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनानं आता रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यास सुरूवात केली असून त्याचाच प्रत्यय काल…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *