‘… तर औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहणाऱ्याचे दात तोडून दाखवा’, नवनीत राणाचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर निशाणा

284 0

नवी दिल्ली- आजच्या शिवसेनेच्या सभेचा टिझर पाहिला. त्यात उद्धव ठाकरे म्हणतात ‘तुम्ही मला वज्रमूठ द्या, दात पाडण्याचं काम मी करतो’. जर इतकी ताकद आहे तर औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहणाऱ्यांचे दात आधी तोडून दाखवा तर तुम्हाला मानेल. असे म्हणत नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान दिले आहे. दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात हनुमान चालिसाचे पठण करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी त्या बोलत होत्या. यावेळी रवी राणा उपस्थित होते.

नवनीत राणा म्हणाल्या, “राणा दाम्पत्य कोणाच्याही रिमोट कंट्रोलने चालणाऱ्यांपैकी नाही. भाजपच्याही नाही. आज आपण महाराष्ट्रातील जनतेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपासून मुक्त करण्यासाठी हनुमान चालीसाचे पठण करत आहोत. मी तुरुंगात असताना दररोज 101 वेळा हनुमान चालिसाचा पाठ करायची. कोणत्याही निर्दोषाने तुरुंगात जावे असे मला वाटत नाही”

नवनीत राणा यांनी पुढे म्हटले,”उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून महाराष्ट्रावर संकट आलेलं आहे. हे संकट दूर करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी मी प्रयत्न करत राहणार आहे. ज्या-ज्या ठिकाणी हनुमान चालीसा मला बोलता येईल त्या ठिकाणी मी बोलणार. मला बंद करण्यासाठी 14 दिवस कमी पडतील. दिल्लीतील हे एक प्राचीन मंदिर आहे आणि त्यामुळे आम्ही येथे महाआरती करत आहोत”

“आजच्या शिवसेनेच्या सभेचा टिझर पाहिला. त्यात उद्धव ठाकरे म्हणतात तुम्ही मला वज्रमूठ द्या, दात पाडण्याचं काम मी करतो. जर इतकी ताकद आहे तर औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहणाऱ्यांचे दात आधी तोडून दाखवा तर तुम्हाला मानेल” या शब्दात नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे.

कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात हनुमान चालिसाचे पठण

हनुमान चालिसा पठण तसेच महाआरती करण्यासाठी राणा दाम्पत्य आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान, दिल्ली येथील त्यांच्या घरापासून पायी हनुमान मंदिरात पोहचले, हे मंदिर त्यांच्या घरापासून सुमारे 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर आहे. उद्धव ठाकरे सरकारपासून सुटका करण्यासाठी हनुमान चालीसा पाठ करतील, असे राणा म्हणाले होते. यावेळी भगवे झेंडे घेऊन समर्थकांसह राणा यांनी पदयात्रा करत ते हनुमान मंदिरात पोहचले.

Share This News

Related Post

शरद पवारांनी आता रिटायर व्हावं; सायरस पूनावाला यांनी व्यक्त केली इच्छा

Posted by - August 30, 2023 0
पुणे: राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर सातत्याने शरद पवार यांनी रिटायर व्हावं आणि नव्या पलीकडे नेतृत्व सोपा व असे मागणी होत…

BJP State President Chandrakantada Patil : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यास सज्ज व्हा…!

Posted by - July 23, 2022 0
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसमोर त्याग आणि शिस्तीचा आदर्श निर्माण केला आहे. पक्षाच्या आदेशानुसार काम…

मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अब्दुल कादिर मौलाना यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात 700 जणांना विषबाधा

Posted by - January 5, 2023 0
संभाजीनगर : संभाजीनगरमधून ( औरंगाबाद ) एक धक्कादायक माहिती समोर येते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अब्दुल कादिर मौलाना यांच्या मुलाच्या…
Jammu - Kashmir

Jammu – Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये मोठी चकमक; 4 पाकिस्तानी दहशतवाद्यांना धाडलं कंठस्थानी

Posted by - December 23, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमध्ये (Jammu – Kashmir) भारतीय लष्कराला मोठे यश मिळाले आहे. अखनूर सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न…
heavy Rain

Maharashtra Weather Alert : राज्यात पुढचे 3-4 तास धोक्याचे; मुंबईसह ‘या’ भागांना देण्यात आला अलर्ट

Posted by - July 17, 2023 0
मुंबई : पावसाने आता ठिकठिकाणी जोर धरायला सुरुवात केली आहे. यामुळे राज्यात पुढचे काही दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *