आई वडिलांच्या भेटीसाठी मुले आतुर; राणा दांपत्याची मुले दिल्लीला रवाना

201 0

नागपूर- नवनीत राणा आणि रवी राणा यांची दोन मुले आईवडिलांपासून २१ दिवस दूर होते. राणा दांपत्याची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर नवनीत राणा रुग्णालयात दाखल झाल्या. त्यामुळे आईवडिलांना भेटण्यासाठी ही मुले अतिशय आतुर झाली होती. आईवडिलांना भेटण्यासाठी आज त्यांची मुलगी आणि मुलगा दिल्लीला गेले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठाण प्रकरणी राणा दांपत्याला मुंबई पोलिसांनी अटक केली. १२ दिवस रवी राणा आणि नवनीत राणा जेलमध्ये होते. त्यानंतर मुबई स्तर न्यायालयाने दोघांचा जामीन मंजूर केला. मानेच्या त्रासामुळे नवनीत राणा या जेलमधून सुटका होताच लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या.

त्यानंतर राणा दांपत्याने दिल्ली गाठत ठाकरे सरकारच्या विरोधात दिल्ली दरबारी गाऱ्हाणे घातले. या सर्व काळात राणा दांपत्याचा मुलगा आणि मुलगी आपल्या घरी होते. २१ दिवस आईवडिलांपासून दूर असलेल्या मुलांना आईवडिलांची आठवण येत होती. अखेर आज दोन्ही मुलांनी आईवडिलांना भेटण्यासाठी दिल्ली गाठली.

 

Share This News

Related Post

संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर मोरया गोसावी मंदीर देवस्थाननं ‘तो’ फलक हटवला

Posted by - August 19, 2023 0
छत्रपती संभाजी महाराज यांच्या अवमान प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने वकिलामार्फत चिंचवडगाव येथील श्री मोरया गोसावी मंदिर…

#PUNE : माजी नगरसेविकेच्या कारला पीएमपीची धडक; ‘नुकसान भरपाई देतो..!’ सांगूनही बस चालकाला नगरसेविकेच्या पतीची जबर मारहाण

Posted by - March 16, 2023 0
पुणे : पुण्यात काल एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील एका माजी नगरसेविकेच्या पतीने पीएमपी बस चालकाला किरकोळ कारणावरून बेदम…

Maharashtra Politics : शरद पवार यांची सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांनी घेतली भेट, पीयूष गोयल यांच्यासोबत बैठक

Posted by - July 20, 2022 0
नवी दिल्ली: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देशातील ज्येष्ठ, अनुभवी, अभ्यासू नेते म्हणून त्यांचा सर्वच राजकीय पक्षाचे नेते आदर करत…

जळगावमध्ये सैराट : रक्षाबंधनाच्या 2 दिवसानंतर भावानेच दाबला बहिणीचा गळा ; प्रियकराची गोळ्या झाडून हत्या

Posted by - August 13, 2022 0
जळगाव ( चोपडा ) : जळगाव मध्ये झालेल्या हत्याकांडानंतर एकच खळबळ उडाली आहे . सख्या भावानेच बहिणीचा गळा दाबून खून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *