‘मला देशद्रोही म्हणून जेलमध्ये टाकले…’ नवनीत राणा यांना अश्रू अनावर

543 0

हनुमान जयंती निमित्त अमरावतीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात खासदार नवनीत राणा रडू आवरले नाही. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कडक शब्दात हल्लाबोल केला.

राणा कुटुंबीय आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये विस्तव देखील जात नाही. नवनीत राणा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आज हनुमान जयंती निमित्त अमरावतीमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात राणे दांपत्याने पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले.

मुंबईत मातोश्री या ठाकरे कुटुंबाच्या खासगी निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण केल्याप्रकरणी ठाकरे सरकारने नवनीत राणा यांना जेलमध्ये टाकले होते. आज कारागृहातील अनुभव सांगताना नवनीत राण यांना अश्रू अनावर झाले. नवनीत राणा म्हणाल्या, ” लॉकअप काय असते हे मला माहित नव्हते. मी स्वत:ला विचारत होते की मी एवढी मोठी कोणती चुक केली की माझ्या महाराष्ट्राला अत्याचारी मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले. कोर्टात गेली तेव्हा सांगितले बेल होणार नाही. मात्र पोलीस स्टेशनची डायरी बघितली तेव्हा मला कळले की मला देशद्रोह म्हणून कारागृहात टाकण्यात आले”

Share This News

Related Post

पुणे : आर्यन खानच्या निर्दोष मुक्ततेला हिंदू महासंघाकडून न्यायालयात आव्हान

Posted by - December 5, 2022 0
पुणे : अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान च्या क्रुझवरील अंमली पदार्थ प्रकरणी झालेल्या निर्दोष मुक्ततेला हिंदू महासंघाकडून उच्च न्यायालयात…

लालमहालात लावणी नृत्य केल्यावरून वैष्णवी पाटील हिचा माफीनामा

Posted by - May 21, 2022 0
पुणे- पुण्यातील ऐतिहासिक लाला महालात लावणी नृत्याचे शूटिंग केल्यावरून सध्या वैष्णवी पाटील आणि कुलदीप बापट यांच्यावर टीकेचा वर्षाव होत आहे.…

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संतोष जाधवला अटक, पुणे पोलिसांनी दिली माहिती

Posted by - June 13, 2022 0
पुणे- पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपींपैकी एक संतोष जाधवला अखेर पुणे ग्रामीण पोलीसांनी गुजरात राज्यातील…
Nashik News

Nashik News : 27 वर्षीय विवाहित ‘त्या’ महिला डॉक्टरच्या अपघाताप्रकरणी ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Posted by - October 12, 2023 0
नाशिक : नाशिकमध्ये (Nashik News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगांव तालुक्यातील न्यायडोंगरी गावात पुन्हा एकदा खून…

TOP NEWS SPECIAL : अष्टविनायक दर्शन , महत्व , इतिहास , दर्शनासाठी हे आहेत मार्ग

Posted by - August 30, 2022 0
अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची श्रीगणेश मंदिर आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *