राणा दांपत्याच्या जामीनअर्जावर उद्या दुपारी 2.45 वाजता सुनावणी

368 0

मुंबई- राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या दांपत्याच्या जामिन याचिकेवर उद्या दुपारी पावणे तीन वाजता सुनावणी होणार आहे.

खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसाचं पठण करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर राज्यातील वातावरण चाललेच पेटून निघाले.

पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक केली. नवनीत राणा यांच्याविरोधात खोटं जात प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच, मुलुंड पोलीस स्थानकातही गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.

त्या दिवशीची रात्र राणा दाम्पत्याची पोलीस कोठडीतच गेली. दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केलं गेलं. न्यायालयानं त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर त्यांच्या जामीन अर्जावर तातडीची सुनावणी नामंजूर करत 29 एप्रिलला सुनावणी होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.

व्यस्त कामकाजामुळे मुंबई सत्र न्यायालयाच्या वतीनं मागील सुनावणीतच स्पष्ट करण्यात आलं होतं की, शक्य झाल्यासच आम्ही शुक्रवारी ही सुनावणी घेऊ. त्यानुसार, आज याचिकाकर्त्या राणा दाम्पत्याच्या वकिलांनी युक्तीवाद केला. त्यानंतर उद्या दुपारी पावणेतीन वाजता ही सुनावणी घेण्याचं मुंबई सत्र न्यायालयानं निश्चित केलं आहे. सध्या राणा दाम्पत्य कारागृहात असून खासदार नवनीत राणा भायखळा कारागृहात आहेत, तर आमदार रवी राणा तळोजा कारागृहात आहेत.

Share This News

Related Post

मित्राच्या लग्नामध्ये प्रियांकाच्या HOT लूकची चर्चा; सोशल मीडियावर प्रियंकाचीच हवा, पहा PHOTO

Posted by - October 11, 2022 0
प्रियांका चोप्रा सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसून येते . तिचे अनेक फोटो ती तिच्या फॅन्ससाठी तिच्या अकाउंट वरून शेअर…
Flight Cancelled

Flight Cancelled : खराब हवामानामुळे पुण्यातून दिल्ली, हैदराबाद, गोव्याकडे जाणारी 14 विमाने रद्द

Posted by - December 29, 2023 0
पुणे : खराब हवामानामुळे पुण्यातून दिल्ली, लखनौ, हैदराबाद, अमृतसर, गोवा या ठिकाणी जाणारी 14 विमाने रद्द (Flight Cancelled) करण्यात आली…

#PUNE : टिळक कुटुंबात उमेदवारी दिली तर निवडणूक बिनविरोध करणार का ? चंद्रकांत पाटलांचा नाना पटोलेंना सवाल

Posted by - February 6, 2023 0
पुणे : भाजप कसबा पोटनिवडणुकीचे उमेदवार हेमंत रासने यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने…

नाही..नाही..म्हणता ..म्हणता..! अब्दुल सत्तारांच्या गळ्यात पडली मंत्रिपदाची माळ, ‘या’ कारणाने शिंदे-भाजप सरकारकडून अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद?

Posted by - August 9, 2022 0
मुंबई : शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यातील TET SCAM  मधील संबंध उघड झाल्यानंतर अब्दुल सत्तार यांच्या मंत्रिपदावर हात आया मुह ना…

सावरकर पुण्यतिथीनिमित्त नागरिकांनी घेतले फर्ग्युसन महाविद्यालयातील ‘त्या’ खोलीचे दर्शन

Posted by - February 26, 2022 0
पुणे- स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वास्तव्य असणाऱ्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील खोलीत आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त नागरिकांनी मोठ्या संख्येने दर्शन घेतले. सावरकरांच्या साहित्याचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *