नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाचे “लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई विमानतळ” नामकरण

113 0

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाचे “लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई विमानतळ”असे नामकरण करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

नामकरणाबाबतचा प्रस्तावाच्या मंजूरीचे 29 जून 2022 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचे कार्यवृत्त मान्यतेसाठी नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळासमोर आणण्यात आले होते. त्यावर हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी फेरसादर करावेत असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार हा प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत फेरसादर करण्यात आला व त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार 12.56 योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्व. पाटील यांचे योगदान आहे. तद्नंतर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी संपादित जमिनीसाठी मोबदला ठरवावयाच्या अनुषंगाने निश्चित करण्यात आलेले 22.5% योजनेचे धोरण सुद्धा 12.5% धोरणाच्या धर्तीवर तयार करण्यात आले आहे.

नवी मुंबई येथे सिडको महामंडळाच्या माध्यमातून 1160 हे. क्षेत्रावर सार्वजनिक खाजगी भागीदारीतून ग्रीनफील्ड विमानतळ विकसीत करण्यात येत आहे. या संपूर्ण 1160 हे.जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची भूविकास कामे प्रगतीपथावर आहेत. या विमानतळाच्या नामकरणाच्या अनुषंगाने नवी मुंबईमधील विविध संघटना व राजकीय पक्षांकडून मागणी करण्यात येत होती.

नवी मुंबई परिसरातील विकासामधील दि.बा. पाटील यांचे योगदान व स्थानिकांच्या विविध संघटनांची मागणी विचारात घेता, नवी मुंबईत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण “लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे करण्यास आज मान्यता देण्यात आली.

Share This News

Related Post

धक्कादायक : हा व्हिडिओ पाहिल्यावर अंगावर काटा येईल ; स्कूलबस ड्रायव्हरला त्या प्रकारानंतर केले निलंबित

Posted by - September 27, 2022 0
शाळेत बसने किंवा व्हॅनने जाणाऱ्या लहान मुलांच्या बाबत आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. यामध्ये अपहरण ,शारीरिक अत्याचार ,अपघात ,आग…

एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत शिवसेनेच्या 12 खासदारांची घेतली भेट 

Posted by - July 19, 2022 0
नवी दिल्ली – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत शिवसेनेच्या (शिंदे गट) 12 खासदारांची भेट घेतली आहे. एकनाथ शिंदे…

रक्तरंजित फोटो, मृतदेह, त्रासदायक व्हिडिओ टीव्ही चॅनल्सने दाखवू नये; माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची प्रसार माध्यमांना सत्ता ताकीद

Posted by - January 9, 2023 0
नवी दिल्ली : माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं प्रसारमाध्यमांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये मृतदेहाचे फोटो रक्ताने माखलेले फोटो किंवा कोणतेही…
Ajit And Sharad Pawar

TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT: काका आता तरी थांबा VS अरे मी काय म्हातारा झालोय का; पुतण्याच्या लढाईत कोण जिंकणार ?

Posted by - July 6, 2023 0
मुंबई : राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर नुकत्याच अजित पवार गट आणि शरद पवारांच्या गटाकडून बैठका घेत शक्तिप्रदर्शन करण्यात करण्यात (TOP…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *