अब्दुल सत्तारांच्या सुप्रिया सुळे यांच्या विषयीच्या ‘त्या’ विधानानंतर पुण्यात राष्ट्रवादी आक्रमक; रूपाली ठोंबरे म्हणाल्या दलिंदर सत्तार…

335 0

पुणे : राजकारणामध्ये आजकाल वैयक्तिक टीकाटिप्पणी मोठ्या प्रमाणावर होते आहे. अनेक वेळा राजकीय नेते अत्यंत वाईट शब्दांमध्ये देखील एकमेकांवर चिखल फेक करत असतात. नुकताच अब्दुल सत्तार यांनी देखील राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांना थेट शिवीगाळ करून अपमान केला. याच गोष्टीचा सध्या महाराष्ट्रभर वनवा पेटला आहे.

पुण्यामध्ये रूपाली ठोंबरे यांनी देखील सत्तार यांच्या वक्तव्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करताना म्हटले आहे की, “मुंबईतील आमचे पदाधिकारी तुम्ही ताब्यात घेतले. तरी संपूर्ण महाराष्ट्रात या दलिंदर सत्तार विरुद्ध महिलांचा अपमान करणाऱ्या या बोक्याविरुद्ध महाराष्ट्रभर आंदोलन होणार. आम्ही महिला राजकारणात अपमान करून घेण्यासाठी आलो नाही. आता कुठे गेल्या चित्रा वाघ असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. सत्तार हा एवढा मोठा मंत्री होता तर का पळून गेला तिथेच थांबायचं होतं…!”असं रूपाली ठोंबरे म्हणाले आहेत.

काय घडले होते ?
काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळेंनी 50 खोके मिळाले का? असा सवाल अब्दुल सत्तारांना केला होता.
यावर सत्तारांनी तुम्हालाही द्यायचे का? असा प्रति प्रश्न केला.
यावर पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर देत तुमच्याकडेच असल्याने तुम्ही ऑफर करत आहात…!असा खोचक टोला लगावला
यावर सत्तारांनी थेट इतकी भ***` झाली असेल तिलाही देऊ…

अशा शब्दात प्रत्युत्तर दिले राजकीय टीकाटिप्पणी करताना केल्या गेलेल्या अवमानकारक याच वक्तव्यामुळे अब्दुल सत्तारांच्या विरुद्ध सध्या राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे.

Share This News

Related Post

devendra-fadnavis

राज्य सरकार हिटलर प्रमाणे काम करतंय – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

Posted by - April 25, 2022 0
राज्य सरकार हिटलर प्रमाणे काम करत असून हल्ले घडवून आणणाऱ्या सरकारशी संवाद कसा साधणार असा म्हणत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र…

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर काँग्रेस कडून गुजरात निवडणुकीची जबाबदारी

Posted by - November 14, 2022 0
गुजरात : गुजरात निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस कडून माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांना प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये त्यांना…
Satara Accident

Satara Accident : महाबळेश्वरला फिरायला गेले असताना दोन जिवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - June 30, 2023 0
सातारा : साताऱ्यामध्ये (Satara Accident) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये साताऱ्यातील खंडाळा तालुक्यातील पंढरपूर फाटा-फलटण रस्त्यावर लोणी येथील एका…

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याने घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट!

Posted by - April 11, 2022 0
 ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा जिंकलेला कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील याने आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र…

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारीच का साजरा करतात मैत्री दिन ?

Posted by - August 7, 2022 0
आज ऑगस्ट महिन्याच्या पहिला रविवार फ्रेंडशिप डे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारीच का फ्रेंडशिप डे का साजरा करतात असा प्रश्न तुम्हालाही…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *