महाराष्ट्रातील तीन परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान

267 0

नवी दिल्ली : आरोग्य क्षेत्राचा कणा असणा-या परिचारिकांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील चार परिचारिकांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. तीन परिचारिकांनी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

वर्ष 2021 चे राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार वितरण सोहळा आज राष्ट्रपती भवनात पार पडला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 50 पर‍िचारिकांना तसेच परिचारक यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय राज्य आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री डॉ. भारती पवार या उपस्थित होत्या.

सोलापूर जिल्ह्यातील मोरूची येथ‍ील मनिषा भाऊसो जाधव, सहायक नर्सिंग मिडवाइफरी (ANM) यांना आरोग्य क्षेत्रात 16 वर्षांचा अनुभव आहे. आतापर्यंत त्यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध आरोग्य विभागातील योजनांचे प्रभावीर‍ित्या अंमलबजावणी केलीली आहे. श्रीमती जाधव यांनी माता आणि बालकल्याण क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. श्रीमती जाधव यांनी क्षयरोग्यांना हाताळण्यासाठी विशेष प्रशिक्षण घेतलेले आहे. त्यांच्या या कामांची दखल घेत आज त्यांचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान‍ित करण्यात आले.

जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला आरोग्य सहाय्यक (एलएचवी) राजश्री तुळशीराम पाटील यांना आरोग्य क्षेत्राचा 22 वर्षाचा अनुभव आहे. श्रीमती पाटील यांचा केंद्र तसेच राज्य शासनाच्या आरोग्य योजनांमध्ये सक्रिय सहभाग असतो. श्रीमती पाटील यांना जिल्हा, राज्य पातळीवर अनेक पुरस्काराने सन्मान करण्यात आलेले आहे.
पुणे येथील राज्य ग्राम आरोग्य परिचारिका (वीएचएन) तसेच राज्य कुटूंब कल्याण कार्यालयाच्या निवृत्त मेट्रन अल्का कोरेकर यांना ही फ्लॅोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरविण्यात आले.

श्रीमती कोरेकर यांनी तीन दशकांपासून अधिक काळ आरोग्य क्षेत्रात सेवा दिलेली आहे. सद्या त्या राज्य सार्वजनिक आरोग्य परिचारीका आहेत. 1989 मध्ये रायगड येथे आलेल्या पुरामध्ये तसेच लातूर येथे आलेल्या भुकंपाच्या प्रसंगी पुर्नवसन झालेल्या रूग्णांची सेवा श्रीमती कोरेकर यांनी केली आहे. वर्ष 2018 मध्ये त्यांना युनीसेफतर्फे लसीकरणाची अंमलबजावणी उत्कृष्ट करण्यासाठी अ दर्ज्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. कोव‍िड काळात केलेल्या रूग्ण सेवांमुळे राज्य शासनाच्यावतीने विविध 4 पुरस्कार तर जागत‍िक आरोग्य संघटनेच्यावतीनेही पुरस्कृत करण्यात आले आहे.
अंजली अनंत पटवर्धन यांनाही फ्लॅोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार जाहिर झाला होता. तथापि काही अपरीहार्य कारणास्वत त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत.

महाराष्ट्राची सुपूत्री मीरा धोटे यांना फ्लॅोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार

मूळ नागपूरच्या असणा-या मीरा धोटे यांनाही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते फ्लॅोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीमती धोटे या दिल्लीतील जयप्रकाश नारायण अपेक्स ट्रामा सेंटर, एम्स येथे उपनर्सिंग अधीक्षक होत्या. मागील 30 वर्षापासून त्या आरोग्य क्षेत्रात कार्यरत होत्या. त्यांनी नर्सिंग व्यवस्थापनात पदविका घेतलेली आहे. कोविडच्या काळात एम्समध्ये सुनियोज‍ित पद्धतीने व्यवस्थापन करण्यात श्रीमती धोटे यांनी महत्वपूर्ण भुमिका निभावली. संक्रमण देखरेख, कायाकल्प, स्वच्छ भारत हे आरोग्याशी संबंधित उपक्रम राबविल्याबद्दल श्रीमती धोटे यांना अनेक प्रमाणपत्रांनी यापूर्वीही सन्मानित करण्यात आलेले आहे.

प्रदान करण्यात आलेले पुरस्कार वर्ष 2021 असून एकूण 50 परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वरूपात पदक, प्रशस्तीपत्र आणि 50 हजार रूपये रोख प्रदान करण्यात आले आहे. हा पुरस्कार 1973 पासून देण्यात येत आहे.

Share This News

Related Post

विधानपरिषदेसाठी भाजपकडून पाच उमेदवार जाहीर, पंकजा मुंडे यांना डावलले

Posted by - June 8, 2022 0
मुंबई – विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपले पाच उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना पुन्हा संधी…
Jayant Patil

Ajit Pawar : अजित पवार गटाकडून जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी

Posted by - July 3, 2023 0
मुंबई : अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेससोबत बंडखोरी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर…

“शरद पवार साहेब हे आरक्षण विरोधी; त्यांची भुमिका निषेधार्ह…!” – संभाजी ब्रिगेड

Posted by - December 30, 2022 0
पुणे : मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायचं नाही, म्हणून शरद पवार साहेबांची ही राजकीय चाल आहे. कारण शरद पवार साहेब…
Satara News

Satara News : मजूरांना डबे देऊन येताना अपघातामध्ये दोन सख्ख्या भावांचा करुण अंत

Posted by - December 10, 2023 0
सातारा : साताऱ्यामधून (Satara News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये जरंडेश्वर साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारापासून काही अंतरावर…
Winter Session

Winter Session : नितेश राणेंनी ‘तो’ फोटो दाखवत ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्यावर केले गंभीर आरोप

Posted by - December 15, 2023 0
नागपूर : नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरू आहे. हे अधिवेशन दिवसेंदिवस वादळी होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यभरात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *