नरेंद्र मोदींचा देहू दौरा ; मोदींना देण्यात येणाऱ्या पगड्यांवरून वाद

402 0

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या पुणे दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते जगतगुरु संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यानिमित्ताने देवस्थान संस्थेतर्फे मोदींसाठी देण्यात येणाऱ्या डिझायनर तुकाराम पगड्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.

देहू संस्थांन विश्वस्तांच्या विनंतीनुसार पुण्यातील सुप्रसिद्ध मुरूडकर झेंडेवाले यांच्या कला वर्कशॉपमध्ये या पगड्या तयार केल्या जात आहे. या पगड्यांवर पारंपरिक पद्धतीने हस्तलिखित गाथा कारागिरांनी लिहिली असून या माध्यमातून संपूर्ण जगात तुकोबांचे विचार पोहचवण्याचा मानस असल्याची माहिती दिली जात आहे. परंतु, नेमक्या याच ओवीवरून आता वाद निर्माण झाला आहे.

सुरुवातीला या पगडीवर ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी’ या ओळी होत्या. परंतु, यावर काहींनी आक्षेप घेतल्यानंतर आता देहू संस्थानाने ओवी बदलल्या आहेत. आता या पगडीवर ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ’ अशा ओळी टाकण्यात आल्या आहेत.

या आधी देखील पुण्यात मेट्रो उद्घाटनाच्या वेळी पंतप्रधानांना महापालिकेकडून देण्यात आलेल्या फेट्यावर शिवमुद्रा होती. मात्र, त्याला आक्षेप घेतला गेल्याने तीही काढण्यात आली होती. आणि आता दुसऱ्यांदा पगडीवरील ओळी बदलण्यात आल्याचा समोर येत आहे.

 

Share This News

Related Post

पुण्यातील भवानी पेठेत स्फोट; कोणतीही जीवितहानी नाही

Posted by - June 12, 2022 0
पुण्यातील भवानी पेठमधील एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. भवानी पेठमधील विशाल सोसायटीमध्ये एक किरकोळ ब्लास्ट झाला आहे. यात कोणतीही…

ऑन ड्युटी नाईट…फुल टाईट ! मद्यधुंद पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा

Posted by - April 10, 2023 0
एक सहायक पोलीस निरीक्षक चक्क ऑन ड्युटी मद्यधुंद अवस्थेत आढळून आल्यामुळे पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे. हा प्रकार हिंगोली जिल्ह्यातील…
Bachchu Kadu

Maratha Reservation : ‘शरद पवार खरे ओबीसी नेते, पण त्यांना मराठ्यांची अडचण’, बच्चू कडूंचा आरोप

Posted by - November 10, 2023 0
अमरावती : मनोज जरांगे पाटील यांनी तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनाला (Maratha Reservation) सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापण्याची…
Sanjay Raut

Sanjay Raut : महाराष्ट्रात शिवसेना मोठा पक्ष म्हणून..; लोकसभेच्या जागा वाटपावर राऊतांनी भूमिका केली स्पष्ट

Posted by - December 29, 2023 0
मुंबई : सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती पाहाता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षाला (Sanjay Raut) कोणत्या आणि…
Gold Rate Today

Gold Rate Today : सोनं-चांदी महागली!

Posted by - January 14, 2024 0
आज देशात सोन्याच्या किमतीत (Gold Rate Today) मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे. सोन्यासह चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. गुडरिटर्न्स…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *