राणे पितापुत्रांना मालवणी पोलिसांचे समन्स, ‘या’ दिवशी हजर राहण्याचे आदेश

349 0

मुंबई- दिशा सालियन मृत्यूप्रकरणावरून केलेल्या खळबळजनक आरोपांमुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणाच्या तपासासंदर्भात आता मालवणी पोलिसांनी नारायण राणे आणि नितेश राणे यांना समन्स बजावले आहे. नितेश राणे यांना ३ मार्च आणि नारायण राणे यांना ४ मार्च रोजी सकाळी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

दिशा सालियन हिच्या मृत्यूनंतर तब्बल दोन वर्षांनंतर १९ फेब्रुवारीला नारायण राणे, त्याचे पुत्र नितेश राणे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये खळबळजनक आरोप करून नवा वाद निर्माण केला होता. दिशा सालियानवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा नारायण राणे यांनी केला होता. यासंदर्भात दिशा सालियानच्या आई-वडिलांनी तक्रार दाखल केली. या आरोपांमुळे सालियन कुटुंबीयांची बदनामी झाल्याचे लेखी तक्रारीमध्ये म्हटले होते. त्यानंतर
नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात मालवणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. राज्य महिला आयोगाने मालवणी पोलीस ठाण्याकडून दिशाच्या मृत्यू प्रकरणाचा अहवाल मागितला होता.

याच प्रकरणाच्या तपासासंदर्भात आता मालवणी पोलिसांनी नारायण राणे आणि नितेश राणे यांना समन्स बजावलं आहे. नितेश राणे यांना ३ मार्च आणि नारायण राणे यांना ४ मार्च रोजी सकाळी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता चौकशीतून काय निष्पन्न होणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Share This News

Related Post

मोठी बातमी! माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा अपघात

Posted by - January 11, 2023 0
अमरावती: शिंदे गटातील प्रहारचे आमदार आणि राज्याचे माजी शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे.यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर इजा…
Pune News

Pune News : इंदापूरच्या तहसीलदारांवर अज्ञाताकडून हल्ला; रॉडने केली गाडीची तोडफोड

Posted by - May 24, 2024 0
पुणे : पुण्यातील (Pune News) इंदापूर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तीनं…
Ramchandra Avsare

भाजपचे माजी आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांचे निधन

Posted by - June 3, 2023 0
भंडारा : राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भंडारा (Bhandara) विधानसभा क्षेत्राचे भाजपचे माजी आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे…

लहान मुलं अभ्यास करायला त्रास देत आहेत? हे उपाय अवलंबून पहा, नक्की चांगला परिणाम दिसेन…

Posted by - October 8, 2022 0
आज-काल खरंतर शिक्षण पद्धतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर बदल झाले आहेत. कमीत कमी वयामध्ये अधिकाधिक विषयांचे पुरेपूर ज्ञान देण्याच्या स्पर्धेमध्ये मुलांचं…
Sana Khan

Sana Khan Murder Case : सना खान यांच्या फोनमधील ‘त्या’ व्हिडिओंमुळे झाला वाद; आरोपीने केला धक्कादायक खुलासा

Posted by - August 15, 2023 0
नागपूर : भाजपच्या अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकारी सना ऊर्फ हिना खान (वय 34 ,रा.अवस्थीनगर) (Sana Khan Murder Case) यांच्या हत्येप्रकरणी तिचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *