सांगलीमध्ये नाना पटोले यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन (व्हिडिओ)

230 0

सांगली- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या विधानाचा निषेध करण्यासाठी सांगलीमध्ये भाजपच्या वतीने नाना पटोले यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात पुन्हा आक्षेपार्ह विधान केल्याने राज्यात संतापाची लाट उसळलेली आहे. पटोले यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यभर भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. सांगलीतही पटोले यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली. भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत पटोले यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी संतप्त झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी पटोले यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करत हे पोस्टर फाडण्यात आले. नाना पटोले यांनी तातडीने जाहीर माफी मागावी, त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. जर पटोले यांनी माफी मागितली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला.

Share This News

Related Post

#Governor : नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचा शनिवारी शपथविधी; कोण आहेत रमेश बैस ? वाचा सविस्तर परिचय

Posted by - February 16, 2023 0
मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल म्हणून रमेश बैस पदाची सूत्रे स्वीकारणार असून त्यांचा शपथविधी समारंभ दि. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी…

TOP NEWS MARATHI INFO: अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणात अटक झालेली अनिक्षा जयसिंघानी कोण आहे?

Posted by - March 17, 2023 0
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना धमकी आणि ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून अनिक्षा जयसिंघानी नावाच्या मुलीला…
Wardha Crime

Wardha Crime : गावात दहशत पसरवणाऱ्या गुंडाला गावकऱ्यांनी ‘या’ पद्धतीने शिकवला धडा

Posted by - August 11, 2023 0
वर्धा : वर्धा (Wardha Crime) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये (Wardha Crime) कारागृहातून जामिनावर आल्यानंतर गावात दहशत…

#PUNE : ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Posted by - January 23, 2023 0
पिंपरी : ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. ते 61 वर्षाचे होते. त्यांच्या मागे…
Eknath Shinde

Irshalwadi Landslide : राज्यातल्या दरडप्रवण क्षेत्रातल्या नागरिकांच्या बाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - July 21, 2023 0
मुंबई : इर्शाळवाडीच्या दरड कोसळण्याच्या (Irshalwadi Landslide) दुर्घटनेनंतर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील (Irshalwadi…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *