राज्यभरात महाविकास आघाडीच्या सभांचा जंगी कार्यक्रम जाहीर ; पुण्यात या दिवशी होणार सभा

599 0

शिंदे फडणवीस सरकार सरकारला सत्तेपासून खाली खेचण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सर्व शक्तीनिशी लढा पुकारला आहे. राज्यभरात सभांचा धडाका लावून शिंदे सरकारला पळता भुई थोडी करायचा निश्चय केला आहे. त्यानुसार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येऊन राज्यभरात सभा घेत आहेत. त्यापैकी संभाजीनगरमध्ये पहिली संयुक्त सभा झाली होती. आता मे महिन्यात पुण्यात सभा होत आहे.

या सभेच्या नियोजनासाठी शनिवारी महाविकास आघाडीच्या पुणे शहरातील नेत्यांची बैठक झाली. बैठकीत सभेसंदर्भात अनेत महत्वाचे निर्णय घेतले गेले. पुणे शहरातील नाना पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रांगणात 14 मे 2023 रोजी रविवारी ही सभा घेण्याचा निर्णय महाविकासआघाडीने घेतला आहे. महाविकास आघाडीचे सर्व नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत. या सभेची जबाबदारी स्वतः अजित पवार यांच्यावर असणार आहे.

उद्धव ठाकरे यांना विशेष खुर्ची मिळणार का ?

संभाजीनगर मध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंना देण्यात आलेल्या खुर्चीवरून बरीच चर्चा झाली होती. उद्धव ठाकरे यांना पाठीचा त्रास असल्याने तशा प्रकारची खुर्ची देण्यात आली होती असे स्पष्टीकरण अजित पवार यांना द्यावे लागले होते. मात्र पुण्यातील सभेत कुठलाही मानपान होणार नाही. आम्ही सगळे एकाच प्लॅटफॉर्मवर असू, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप व काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिले.

महाविकास आघाडीच्या सभेचा कार्यक्रम

16 एप्रिल 2023 रोजी दुसरी सभा- नागपूर, सुनील केदारे यांच्यावर या सभेची जबाबदारी
1 मे 2023 रोजी तिसरी सभा- मुंबई, आदित्य ठाकरे यांच्यावर या सभेची जबाबदारी
14 मे 2023 रोजी चौथी सभा- पुणे, अजित पवार यांच्यावर या सभेची जबाबदारी
28 मे 2023 रोजी पाचवी सभा- कोल्हापूर, सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यावर या सभेची जबाबदारी
3 जून 2023 रोजी सहावी सभा- नाशिक, छगन भुजबळ यांच्यावर या सभेची जबाबदारी
6 जून 2023 रोजी सातवी सभा- अमरावती, यशोमती ठाकूर यांच्यावर या सभेची जबाबदारी

Share This News

Related Post

#LOCKDOWN : भारतीयांच्या आयुष्यातील त्या काळ्या आठवणींना तीन वर्षे पूर्ण; आजच्याच दिवशी पंतप्रधानांनी लॉकडाऊनची केली होती घोषणा

Posted by - March 24, 2023 0
भारत : 2020 मध्ये भारतात कोरोना अक्षरशः तांडव केला होता. अर्थात जगभरातील इतर देशांची ही काही वेगळी परिस्थिती नव्हती. तेव्हा…

काल महाआरती आज पत्रकार परिषद ; राज ठाकरेंच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष

Posted by - April 17, 2022 0
राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे.. काल पुण्यातील खालकर चौकातील हनुमान आरतीवरून आणि राज ठाकरेंच्या भोंग्यांबाबतच्या भूमिकेवरून…

breking News श्रीरामपूरमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग, कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी

Posted by - March 28, 2022 0
श्रीरामपूर- अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये एका केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग मोठ्या प्रमाणात पसरली असून संपूर्ण कंपनी…
Nanded Loksabha

Nanded Loksabha : नांदेडमधल्या मतदानाला लागलं गालबोट; तरुणाने थेट कुऱ्हाडीने EVM फोडलं

Posted by - April 26, 2024 0
नांदेड : आज देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीच्या (Nanded Loksabha) दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलं. यामध्ये महाराष्ट्रातल्या 8 मतदारसंघांचाही समावेश आहे. महाराष्ट्रात…

‘….. म्हणूनच शिवजयंती तिथीनुसारच साजरी करायची’, राज ठाकरेंनी सांगितले कारण

Posted by - February 19, 2022 0
मुंबई- वाढदिवस वगैरे या गोष्टी सामान्य माणसांसाठी असतात. महापुरुषांची जयंती असते. शिवाजी महाराजांचा जन्म दिवस हा आपल्यासाठी एक उत्सवच आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *