मुख्यमंत्र्यांकडून मुंबई मेट्रोला हिरवा झेंडा, पहिले तिकीट काढून मेट्रो प्रवासाचा घेतला आनंद

370 0

मुंबई- गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईकरांना गिफ्ट मिळाले आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई मेट्रो 2A, आणि मेट्रो 7 या दोन्ही मार्गिकेचे उद्घाटन करण्यात आले. या दोन्ही मार्गाच्या मेट्रो सुरु झाल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार असून वाहतूक कोंडीतून ही त्यांची सुटका होणार आहे.

या उद्घाटन सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई आणि आमदार सुनील प्रभू, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि पालकमंत्री अस्लम शेख उपस्थित होते.

ऐन उन्हाळ्यात ही मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत आल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. दहिसर ते आरे मिल्क कॉलनी मेट्रो मार्गाचे लोकार्पण केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो अधिकाऱ्यांकडू मेट्रो संबधित माहिती जाणून घेतली. मुख्यमंत्र्यांनी याच मेट्रोतून प्रवास केला. यावेळी पहिलं तिकीट काढून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रोत प्रवेश केला. यावेळी इतर मान्यवरही सोबत होते. यावेळी ही पहिली मेट्रो फुलांनी सजवण्यात आली होती.

मेट्रो 7 आणि 2A या मार्गावर एकत्रिपणे पहिल्या टप्प्यामध्ये 20 किलोमीटर मार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे. यानंतर आता या मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यात 15 किमी मार्गावर मेट्रो चालवण्यात येणार आहे. अद्यापही काही मेट्रो स्थानकावरील कामे अपूर्ण आहेत. ही कामे आणि आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो धावणार आहे. मुंबई ‘मेट्रो 7’ च्या तिकिटाचे किमान दर 10 रुपये असणार असून कमाल दर 80 रुपये असणार आहेत.

‘मेट्रो 2 अ’ हा 18.5 किमी लांबीचा आहे. दहिसर पश्चिम ते डीएन नगर स्थानकापर्यंत ‘मेट्रो 2 अ’ मार्ग असणार आहे. या मार्गात दहिसर पूर्व, अप्पर दहिसर, कांदरपाडा, मंडपेश्वर, एकसर, बोरिवली (पश्चिम), शिंपोली, कांदिवली (पश्चिम), धनुकरवाडी, वलणई, मालाड (पश्चिम), लोअर मालाड, पहाडी गोरेगाव, गोरेगाव (पश्चिम), ओशिवरा, लोअर ओशिवरा आणि डीएन नगर अशी स्थानके असणार आहेत.

मेट्रो-7 मार्गावर 14 स्थानके असणार आहेत. दहिसर पूर्व, ओवरीपाडा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, देवीपाडा, मागाठाणे, पोईसर, आकुर्ली, कुरार, दिंडोशी, आरे , गोरेगाव पूर्व (महानंद डेअरी), जोगेश्वरी पूर्व (जेव्हीएलआर जंक्शन), शंकरवाडी, गुंदवली (अंधेरी पूर्व) या स्थानकांचा समावेश आहे.

Share This News

Related Post

EWS आरक्षण हा बौद्धिकदृष्ट्या भ्रष्ट निर्णय, मागच्या दाराने मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न : ॲड. प्रकाश आंबेडकर

Posted by - November 8, 2022 0
EWS आरक्षणावरती सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. हा निकाल पाहता हा वैचारिक भ्रष्टाचार आहे असेच याबद्दल म्हणता येईल. मागच्या दाराने पुन्हा…
Santosh Bangar

Santosh Bangar : ‘…तर दोन दिवस उपाशी राहा’; आमदार संतोष बांगरांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला

Posted by - February 10, 2024 0
हिंगोली : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असणारे हिंगोलीचे शिंदे गटाचे आमदार एका व्हिडीओमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कायमच…

#HEALTH WEALTH : दीर्घायुष्यासाठी तासंतास नव्हे तर फक्त 11 मिनिटांची चाल पुरेशी ! फक्त चला असे…

Posted by - March 3, 2023 0
#HEALTH WEALTH : आपले आरोग्य राखण्यासाठी दररोज व्यायाम करणे किंवा कोणत्याही प्रकारची शारीरिक क्रिया करणे खूप महत्वाचे आहे. धोकादायक आजार…

भैय्यू महाराज आत्महत्या प्रकरण ; मुख्य सेवक विनायक, ड्रायव्हर शरद आणि केअरटेकर पलक दोषी

Posted by - January 28, 2022 0
इंदोर – आध्यात्मिक गुरु भैय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी विनायक, चालक शरद आणि केअरटेकर पलक यांना दोषी ठरवण्यात आले आहे. या…
Nagpur News

Nagpur News : नागपूर हादरलं ! मोबाईल दिला नाही म्हणून मुलानं आपल्या जन्मदात्या आईला दिली ‘ही’ शिक्षा

Posted by - October 21, 2023 0
नागपूर : नागपूरमधून (Nagpur News) आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फसणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका शुल्लक कारणावरून निर्दयी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *