केंद्रीय नागरी विमान मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते मल्टीलेवल पार्किंगचे उद्घाटन : खासदार गिरीश बापट

209 0

पुणे : केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधियाजी यांच्या हस्ते पुणे विमानतळावरील मल्टीलेवल पार्किंगचे दिनांक 25 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 वाजता उद्घाटन होणार असल्याचे खासदार गिरीश बापट यांनी सांगितले.

यावेळी बोलताना खासदार बापट यांनी सांगितले की पुणेकर आणि पुणे विमानतळावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांना वाहनतळाचा प्रश्न भेडसावत होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी विमानतळा लगत मल्टीलेवल पार्किंग उभारण्यात आले. या वाहनतळामुळे प्रवाशांना विमानतळावर पार्किंगच्या सुविधेबरोबर इतर सुविधाही उपलब्ध होणार आहे. या वाहनतळाचे काम तातडीने पूर्ण करून ते नागरिकांकरिता उपलब्ध करून देणे गरजेचे होते. म्हणून मी सातत्याने त्याचा पाठपुरावा करत होतो. सप्टेंबर २०२२ मध्ये सिंधियाजी हे पुणे दौऱ्यावर आले असता त्यांना या वाहनतळाच्या उद्घाटनाकरीता वेळ देणेसाठी विनंती केली असता त्यांनी उद्घाटनाकरिता वेळ देणेबाबत होकार दर्शविला.

सद्यस्थितीत वहानतळाचे सर्व काम पूर्ण झाले असल्यामुळे दिनांक 25 नोव्हेंबर २०२२ रोजी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री सिंधिया जी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तसेच या कार्यक्रमासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील, राज्यसभा खासदार श्रीमती वंदना चव्हाण, वडगाव शेरी मतदार संघाचे आमदार श्री सुनील टिंगरे व इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे खासदार बापट यांनी सांगितले.

Share This News

Related Post

MIT Pune

MIT : एमआयटी तर्फे घेण्यात आला सुवर्णपदक विजेत्या सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

Posted by - December 26, 2023 0
पुणे : “शाळा ही ज्ञान मंदिर असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी रोज नवनवीन गोष्टी शिकणे, नीटनेटकेपणा अंगीकारणे, वक्तशिरपणा आणि देश प्रेम असावे.…
Uddhav Thackeray

‘माझ्याच लोकांनी धोका दिला, म्ह्णून ही परिस्थिती उद्भवली’, कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांचे भावनिक उद्गार

Posted by - June 29, 2022 0
मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान…
Buldhana Bus Accident

Buldhana Bus Accident: ‘समृद्धी’वरील अपघात प्रकरणी आली मोठी अपडेट; बसचालकाविरोधात ‘या’ कलमांतर्गत दाखल केला गुन्हा

Posted by - July 1, 2023 0
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा शहराजवळ (Buldhana Bus Accident) आज सकाळी बसचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात 25…
Chandrakant Patil

पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना पुढच्या महिन्यापासून संपुर्ण वेतन आयोग लागू; चंद्रकांत पाटलांची माहिती

Posted by - June 15, 2023 0
पुणे : मागील काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितल्यानंतर पीएमपीचे अध्यक्ष ओम प्रकाश बकोरिया (Om Prakash Bakoria)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *