कोण राज्यपाल? मला त्यांचं नाव घ्यायचं नाही! निर्धार शिवसन्मानाचा कार्यक्रम रायगडावर सुरू

249 0

रायगड : खासदार उदयनराजे भोसले यांचा निर्धार शिवसन्मानाचा कार्यक्रम रायगडावर सुरू आहे. यावेळी शिवप्रेमींशी बोलत असताना त्यांनी भाजप आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर रोष व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, भीती वाटते, खंत वाटते, वेदना होतात, किती स्वार्थी आणि व्यक्ती केंद्रित लोक झाले आहेत. लोकांमध्ये विधिष्ठ जरी आलं तरी चालेल, पण माझा स्वार्थ साधला गेला पाहिजे. मी सत्तेत आलो पाहिजे हा विचार महाराजांनी केला नव्हता त्यांनी रयतेचा विचार केला होता. तुमचा आमचा विचार केला होता. केवळ शिवाजी महाराजच नाही तर ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंची खिल्ली उडवावी असा अवमान राज्यपालांनी केला आहे.

यावेळी उदयनराजेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावर त्यांचा चांगला समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, या लोकांना महाराजांचा अपमान करणं अंगवळणी पडलं आहे. अशा विकृतांच फावलं आहे. एक बोलला म्हणून दुसरा बोलतो कोण राज्यपाल त्याचं नाव घ्यायचं नाही ते कधी मोठे नव्हतेच राज्यपाल पद हे सर्वात मोठं आहे ते सन्मानाचं पद आहे. महाराजांचा अवमान हा आपला अवमान वाटत नाही का? आपण काही करणार आहोत की नाही या राजकारण्याच्या किती दिवस तावडीत राहणार… आज हा देश विकृत लोकांच्या तावडीत गेला हे सांगताना खंद वाटते अशी व्यथा देखील उदयनराजे यांनी व्यक्त केली आहे.

Share This News

Related Post

Rahul Narvekar

Maharashtra Politics : न्यायालयाच्या नोटीसवर राहुल नार्वेकरांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - July 14, 2023 0
मुंबई : उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या…

Yes Bank and DHFL fraud case : संजय छाब्रियांची 251 कोटी ; तर अविनाश भोसलेंची 164 कोटींची मालमत्ता जप्त ,लंडनमधील ‘ती’ इमारत वादाच्या भोवऱ्यात

Posted by - August 3, 2022 0
पुणे : ईडीने पीएमएलए 2002 अंतर्गत येस बँक आणि डीएचएफएल फसवणूक प्रकरणात व्यावसायीक संजय छाब्रिया यांची 251 कोटी रुपयांची मालमत्ता…
raj-thackeray

‘आपला आदेश आम्हाला शिरसावंद्य’; भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर सामान्य कार्यकर्त्याचे राज ठाकरेंना भावनिक पत्र

Posted by - April 12, 2024 0
मुंबई : नेहमीच सत्ताधारी पक्षांना आपल्या भाषणातून चपराक देणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदा झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात वेगळी भूमिका…

#CRIME NEWS : एकाच कुटुंबातील चौघांची हत्या की आत्महत्या ? त्याच कुटुंबातील तीन लहान मुले अद्याप बेपत्ता

Posted by - January 24, 2023 0
शिरूर : शिरूर चौफुला रोडवर असलेल्या दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीत असलेल्या भीमा नदीच्या पात्रात 18 जानेवारी रोजी एका महिलेचा मृतदेह…
Breaking News

मोठी बातमी : हवेली तालुक्यातील पिंपरी सांडस ग्रामस्थांनी मतमोजणी प्रक्रिया थांबवली

Posted by - December 20, 2022 0
पुणे : हवेली तालुक्यातून मोठी बातमी समोर येते आहे. हवेली तालुक्यातील पिंपरी सांडस ग्रामस्थांनी मतमोजणी प्रक्रिया थांबवली आहे. ईव्हीएम वर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *