यंदा पावसाचे आगमन दहा दिवस आधीच, कधी येणार मान्सून ? जाणून घ्या

465 0

नवी दिल्ली- समस्त देशवासियांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. यंदा देशात 10 दिवस आधीच मान्सून दाखल होणार आहे. मान्सून 20 किंवा 21 मे रोजी केरळच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. त्यानंतर तो पुढील काही दिवसात देशाच्या उर्वरित भागात बरसणार असल्याचा अंदाज ‘युरोपियन सेंटर फॉर मीडियम-रेंज वेदर पह्रकास्ट’ या संस्थेने वर्तवला आहे.

सध्या देशात उन्हाचा चटका वाढला आहे. दिवसेंदिवस तापमानात देखील वाढ होत आहे. पाण्याची टंचाई देखील भासत आहे. त्यामुळे पाऊस लवकर सुरु झाल्यास त्याचा शेतकऱ्यांना आणि नागरिकांना फायदा होऊ शकतो.

दरम्यान, दरवर्षी मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये दाखल होतो. यंदा दहा दिवस आधीच मान्सूनची बरसात सुरु होणार आहे. बंगालच्या उपसागरात झालेल्या हवामान बदलानुसार सध्या अरबी समुद्रात अँटी-सायक्लोन क्षेत्र तयार होत असल्याचे संकेत मिळतात. त्यामुळे मान्सून केरळमध्ये लवकर पोहचणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने 14 एप्रिलला जाहीर केला होता. यंदा देशात सरासरीच्या 99 टक्के पाऊस पडणार आहे. हा पहिला अंदाज आहे. एकूण पावसाच्या 74 टक्के पाऊस हा जून ते सप्टेंबर या कालावधीत पडत असतो. फक्त शेतकऱ्यांसाठीच नाही तर सर्वच नागरिकांसाठी महत्त्वाचा मानला जातो. पाऊसमान चांगला होण्याच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांना नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Share This News

Related Post

Jalgaon News

Jalgaon News : ‘या’ शुल्लक कारणावरून मामीनेच केला भाच्याचा गेम; जळगाव हादरलं

Posted by - October 1, 2023 0
जळगाव : जळगावमधून (Jalgaon News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये उधार दिलेले पैसे मागितल्याचा राग आल्यानं भुसावळमध्ये 31…
Buldhana News

Buldhana News : बुलढाणा हळहळलं ! महिलेची चिमुकल्यासह विहिरीत उडी; तरुण मदतीला धावला मात्र…

Posted by - November 8, 2023 0
बुलढाणा : अवघ्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. यादरम्यान बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातील भरोसा या गावात एक मोठी दुर्दैवी…

मोठी बातमी ! ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक

Posted by - April 8, 2022 0
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर राज्यातील घडामोडी वेगाने घडताना दिसत आहेत. या प्रकरणी आता एसटी कर्मचाऱ्यांचे वकील…

मेळघाट येथे दूषित पाण्याने मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - July 9, 2022 0
मेळघाटमध्ये पाचडोंगरी आणि कोयलारी गावात विहिरीतील दूषित पाणी पिण्याने मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून…
Jalgaon News

Jalgaon News : जळगाव हादरलं ! पत्नी अन् 9 महिन्यांच्या चिमुकलीची हत्या अन् पतीचीही आत्महत्या

Posted by - April 13, 2024 0
जळगाव : जळगावमधून (Jalgaon News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये जामनेर तालुक्यात देऊळगाव गुजरी इथं पत्नीसह…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *