लवकरच मुंबईमध्ये मान्सूनच्या सरी बरसणार! या दिवशी मान्सून धडकणार

153 0

मुंबई- उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना लवकरच त्यामधून सुटका मिळणार आहे. यंदा मान्सूनची आगेकूच समाधानकारक असून मुंबई आणि पश्चिम किनारपट्टीवर पुढील महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात मान्सून धडकणार आहे.

हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएमडीने चार आठवड्यांचा मान्सून पावसाच्या आगमनाचा चार्ट जारी केला आहे, त्यानुसार मुंबई आणि महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील इतर भागात ३ ते ९ जून दरम्यान मान्सूनचे आगमन होईल. केरळमधील मान्सूनच्या आगमनाआधारे हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशाच्या नैऋत्य भागात मान्सून आल्यानंतर त्याआधारे देशाच्या उर्वरित भागाचा अंदाज निश्चित केला जातो.

मुंबईकरांना यंदा उकाड्यापासून लवकर दिलासा मिळणार आहे. कारण, यंदा मुंबईत मान्सून लवकर धडकणार आहे. पुढील महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. देशाच्या नैऋत्य भागात मान्सून आल्यानंतर त्याआधारे देशाच्या उर्वरित भागाचा अंदाज निश्चित केला जातो.

केरळ आणि उर्वरित नैऋत्य भागात २० मे पासून मुसळधार पाऊस सुरू होणार असल्याचं सांगितलं गेलं आहे. मुंबई आणि इतर पश्चिम किनारपट्टी भागांमध्ये मान्सूनपूर्व सरींच्या आगमनानुसार ३ जून किंवा त्यानंतर हा पाऊस हळूहळू पश्चिम किनार्‍याकडे जाण्याची अपेक्षा आहे. या पावसाची तीव्रता १० ते १६ जूनपर्यंत वाढेल, ज्यामुळे मुंबई आणि देशातील बहुतांश भाग मान्सूनच्या पट्ट्यात येईल.

Share This News

Related Post

“ज्यांना रताळे आणि बटाटे याचा फरक कळत नाही त्यांनी पायरी सांभाळून वागावे…!” प्रदेशाध्यक्ष बदलाच्या मागणीवरून आशिष देशमुखांना रोहन सुरवसे पाटील यांनी फटकारलं

Posted by - January 19, 2023 0
मुंबई : ज्यांना रताळे आणि बटाटे याचा फरक कळत नाही त्यांनी पायरी सांभाळून वागावे; प्रदेशाध्यक्ष बदलाच्या मागणीवरून आशिष देशमुखांना रोहन…

‘आज पुन्हा शाईची मुक्त उधळण होणार? मु. पोस्ट सांगवी’ ; चंद्रकांत पाटलांना शाई फेकीची धमकी !

Posted by - December 17, 2022 0
पिंपरी-चिंचवड : पुण्याचे पालकमंत्री तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा शाईफेक करण्याची धमकी देण्यात आल्यानं एकच…

मुंबई पुणे एक्सप्रेस-वे वर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू; दोन गंभीर जखमी

Posted by - November 18, 2022 0
मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर रात्री १२च्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पाच जण ठार झाले आहेत. तर दोघा…

अक्षय्य तृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ’ गणपती ला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य

Posted by - April 22, 2023 0
पुणे : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. लाडक्या गणपती बाप्पांच्या…

महाराष्ट्रातील चार मान्यवरांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान

Posted by - March 29, 2022 0
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. राष्ट्रपतींच्या हस्ते…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *