येरवडा कारागृहातील बराकीत आढळला मोबाईल फोन

401 0

येरवडा कारागृहातील एका बराकीमधील बाथरुममध्ये मोबाईल फोन आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली.

याप्रकरणी कारागृह विभागाच्या वतीने सागर बाजीराव पाटील (वय ३८, रा. जेल वसाहत, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारागृहातील अधिकारी भिरु सोमनाथ खळबुटे, अतुल तोवर हे कारागृहातून सर्कल क्रमांक १, बरॅक क्रमांक ३ मधील बाथरुमची झडती घेत असताना तेथील बाथरुमच्या वर फिर्यादी यांना पत्रा वाकलेला दिसला. त्या ठिकाणाची झडती घेतली असता तेथे एक काळ्या रंगाचा नोकिया कंपनीचा मोबाईल आढळून आला.

ही बाब अधिकार्‍यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना कळविली. कारागृह विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी याबाबत दोषींवर कारवाईसाठी तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. हा मोबाईल नेमका कोणी ठेवला होता. त्यावरुन कोण, कोण कोणाशी बोलले, याची माहिती घेतली जात आहे. त्यानंतर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अशोक काटे तपास करीत आहेत.

येरवडा कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

३ एप्रिल रोजी येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली होती. हा प्रकार येरवडा कारागृहातील किशोर विभागातील बॅरक क्रमांक २ च्या जवळील हौदाजवळ घडला होता. गेल्या वर्षी आळंदी येथे दोन गटात झालेल्या भांडण प्रकरणात काही जणांना अटक केली होती. त्यानंतर आरोपींना न्यायालयीन कैदी किशोर विभागात ठेवण्यात आले. या विभागात इतरही न्यायालयीन कैदी आहेत. या आरोपींची इतर कैद्यांशी भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरुन त्यांनी कैद्यांनी मिळेल ते साहित्य हातात घेऊन हाणामारी केली.

वारंवार अशा घटना घडत असल्यामुळे येरवडा कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Share This News

Related Post

Soumya Viswanathan Murder Case

Soumya Viswanathan Murder Case : साकेत कोर्टाचा मोठा निर्णय ! पत्रकार सौम्या विश्वनाथन हत्या प्रकरणातील पाचही आरोपी दोषी

Posted by - October 18, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 2008 मध्ये टीव्ही पत्रकार सौम्या विश्वनाथनची हत्या (Soumya Viswanathan Murder Case) करण्यात आली होती. या…

‘परिणीता’चे दिग्दर्शक सुजित सरकार यांचे निधन

Posted by - March 24, 2023 0
‘परिणीता’चे दिग्दर्शक सुजित सरकार यांचे मूत्रपिंडाच्या आजाराने निधन झाले. चित्रपट निर्माते प्रदीप सरकार यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले.…
Pune News

Pune News : खळबळजनक ! पिझ्झा डिलिव्हर करण्यासाठी उशीर झाल्याने ग्राहकाची डिलिव्हरी बॉयला मारहाण

Posted by - October 25, 2023 0
पुणे : आजच्या बदलत्या जीवनशैलीनुसार लोकांच्या राहणीमानात बदल होताना दिसत आहे. या धावपळीच्या जगात (Pune News) लोक वेळ वाचवण्यासाठी ऑनलाईन…
Suhas Diwase

Pune News : जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘माय फस्ट सेल्फी वोट’ स्पर्धेचे आयोजन

Posted by - May 2, 2024 0
पुणे : जिल्ह्यात 7 व 13 मे रोजी होणाऱ्या लोकसभा (Pune News) सार्वत्रिक निवडणूकीत सर्व विधानसभा मतदारसंघात नवयुवा तसेच महिला,…
Jalgaon News

Jalgaon News : जळगाव झालं सुन्न ! श्रावण सोमवारनिमित्त मंदिरात गेलेल्या एकाच कुटुंबातील 3 तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - August 22, 2023 0
जळगाव : जळगाव (Jalgaon News) जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातल्या (Jalgaon News) गिरणा व तापी नदीच्या संगमावर असलेल्या रामेश्वर महादेव मंदिरात श्रावण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *