psi-somnath-zende

Pimpri Chinchwad Police : अखेर ‘त्या’ कोट्यधीश PSI वर करण्यात आली ‘ही’ कारवाई

1060 0

पिंपरी : पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad Police) करोडपती PSI सोमनाथ झेंडेंवर आता पोलीस खात्याकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यांना पोलीस खात्यातून 6 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात तैनात असलेले उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी ड्रीम इलेव्हन अ‍ॅपवर एक टीम तयार केली होती. त्यांची टीम रँक-1 वर राहिली आणि सोमनाथ यांनी 1.5 कोटी रुपये जिंकले. एवढी मोठी रक्कम जिंकल्यानंतर सोमनाथ यांनी माध्यमांसमोर आपला आनंद व्यक्त केला होता. मात्र त्यांना हाच आनंद व्यक्त करणे महागात पडले आहे. ही बातमी पोलीस खात्यापर्यंत पोहोचली आणि अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. अखेर आता या प्रकरणी सोमनाथ झेंडे यांना निलंबित करण्यात आलं आहे.

ऑनलाईन पैसे लावणे तसेच वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहचवल्याचा ठपका सोमनाथ झेंडेंवर ठेवण्यात आला आहे. मात्र त्यांना विभागीय चौकशीत स्वतःचं म्हणणं मांडण्याची मुभा मिळणार आहे. विश्चचषकाच्या सामन्यावेळी झेंडेंनी ड्रीम 11 या ऑनलाइन गेममध्ये स्वतःची टीम लावली अन त्यात ती अव्वल ठरली. त्यामुळे झेंडे अवघ्या आठ तासांत कोट्यधीश झाले होते. दीड कोटींची त्यांना लॉटरी लागल्यानं कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. याच आनंदाच्या भरात झेंडेंनी पोलिसांच्या वर्दीत माध्यमांना मुलाखती दिल्या. यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी याची चौकशी केली आणि यामध्ये त्यांचे निलंबन करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड भाजपाचे माजी संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी झेंडेविरुद्ध राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दिली होती. झेंडे हे कर्तव्यावर असताना ऑनलाइन जुगार खेळत असल्याचा आरोप थोरात यांनी केला आहे. ऑनलाइन जुगार वा गेम यापासून तरुण पिढीला वाचविण्यासाठी शासन व विविध घटकांकडून उपक्रम राबविले जात असताना झेंडे हे ऑनड्यूटी ऑनलाइन जुगार कसा खेळतात, असा सवाल थोरात यांनी केली होता. त्यानंतर आता याप्रकरणी झेंडे यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Share This News

Related Post

BREAKING : डी.एस.कुलकर्णींचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा ; सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Posted by - July 26, 2022 0
पुणे : पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. अशी माहिती डी.एस.कुलकर्णींचे वकील अशितोष श्रीवास्तव यांनी…

दसरा मेळावा शिवतीर्थवर होणार ? मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी

Posted by - September 23, 2022 0
मुंबई : दसरा मेळावा यावरून शिवसेना आणि शिंदे गटाच्या वतीने अर्ज करण्यात आले होते. एखाद्या मैदानावर सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी…
Solapur Accident

Soalpur Accident: बाळूमामांच्या दर्शनाहून परतताना दुर्दैवी अपघातात दोन जिवलग मित्रांचा मृत्यू

Posted by - June 19, 2023 0
सोलापूर : राज्यात अपघाताचे (Soalpur Accident) प्रमाण काही कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. सांगोला तालुक्यातील आदमापूर येथील मंदिरातून बाळूमामांचे…

भाजपाचं ‘मिशन बारामती’; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारी बारामतीत

Posted by - September 5, 2022 0
बारामती: भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारी बारामती दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सूचनेनुसार आगामी लोकसभा…

17 सप्टेंबर… मराठवाडा मुक्ती संग्राम दिन विशेष !

Posted by - September 17, 2022 0
भारत स्वतंत्र झाल्यानंतर तीन संस्थानं या स्वतंत्र भारतात सामील झालेली नव्हती. त्यापैकीच एक म्हणजे मराठवाडा ! स्वतंत्र भारतात विलीन होण्यासाठी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *