पुणे : श्री शारदा सहकारी बँकेचे कॉसमॉस बँकेमध्ये विलीनीकरण

326 0

पुणे : रिझर्व बँकेने मार्च 2021 मध्ये सहकारी बँकांच्या विलीनीकरणाबाबत परिपत्रक काढले होते त्यानुसार सहकार क्षेत्रातील देशातील कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक आणि शारदा सहकारी बँकेचे हे पहिलेच विलीनीकरण झाले आहे. 

कॉसमॉस बँकेचे जेष्ठ संचालक डॉ मुकुंद अभ्यंकर उपाध्यक्ष सचिन आपटे आणि व्यवस्थापकीय संचालिका अपेक्षिता ठिपसे यांनी पत्रकार परिषद घेऊन या विलीनीकरणाबाबत सविस्तर माहिती दिली. शारदा सहकारी बँकेच्या आठ शाखा आहेत या बँकेची व्यावसायिक उलाढाल 550 कोटी रुपयांची आहे.

या यावेळी उपाध्यक्ष सचिन आपटे म्हणाले की, रिझर्व बँकेचे परिपत्रक आल्यानंतर दोन्हीही बँकांनी सकारात्मक विचार करून ऑक्टोबर 2021 मध्ये विलीनीकरण प्रस्ताव रिझर्व बँकेकडे दाखल केला होता या बिलोनीकरणानंतर सात राज्यांमध्ये विस्तार असलेल्या कॉसमॉस बँकेच्या एकूण 152 शाखा आहेत 28 हजार कोटी रुपयांची उलाढाल कॉसमॉस बँक करते. तर या बँकेने आतापर्यंत 16 बँकांचे विलीनीकरण करून घेतले आहे.

तर या वेळीकरणामुळे शारदा बँकेच्या आठ शाखांमधून कॉसमॉस बँकेच्या नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, व्हाट्सअप बँकिंग या अत्याधुनिक सेवांचा लाभ बँकेच्या सर्व खातेदारांना मिळणार असल्याचं सांगून या आधुनिक सुविधा खातेदारांना मिळाव्यात या हेतूने शारदा सहकारी बँकेने विलीनीकरण केल्याचे व्यवस्थापकीय संचालिका अपेक्षिता ठिपसे यांनी सांगितले.

Share This News

Related Post

25 पैशांच्या नाण्यावर नारायण राणेंचा फोटो; प्रकरण पोहोचले पोलीस स्टेशन पर्यंत, वाचा सविस्तर

Posted by - October 28, 2022 0
महाराष्ट्र : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी चलनी नोटांवर…
Pune Crime News

Pune Crime News : खळबळजनक ! सिंहगड रोडवरील क्वॉलिटी लॉजजवळ लाईन बॉयचा खून

Posted by - September 29, 2023 0
पुणे : पुणे (Pune Crime News) सध्या गुन्हेगारीचे केंद्रबिंदू बनले आहे. सध्या पुण्यात गुन्ह्याचे प्रमाण खूप वाढले आहे. सिंहगड रस्त्यावर…

पुण्यातील मावळ तालुक्यात सरपंचाचा निर्घृण खून; आरोपी फरार

Posted by - April 2, 2023 0
पुणे: पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातून एक भयंकर घटना समोर आली आहे. तालुक्यातील प्रति शिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरगाव येथे राष्ट्रवादी…

वसंत मोरे मनसेच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून लेफ्ट

Posted by - April 7, 2022 0
पुणे- मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा आम्ही मशिदींसमोर हनुमान चालिसा लावू असा इशारा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात दिला होता.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *