प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची नागपुरात बैठक; राज्यातील समस्या, संघटनात्मक बांधणी, आगामी निवडणुकांवर विचारमंथन

356 0

नागपुर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक उद्या मंगळवार दि. १० जानेवारी रोजी नागपूर येथे होत आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी, आगामी निवडणुका, राज्यातील ज्वलंत समस्या या विषयावर या बैठकीत विचारमंथन करण्यात येणार आहे.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व प्रभारी एच. के. पाटील तसेच ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानाचे महाराष्ट्र प्रभारी, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होत आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, देशाचे माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, आ. प्रणिती शिंदे, आ. कुणाल पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी संपतकुमार, आशिष दुआ, सोनल पटेल, आमदार, खासदार व प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष आघाडी संघटनांचे प्रदेशाध्यक्ष या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

महागाई, बेरोजगारी, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा भ्रष्ट कारभार, आगामी विधान परिषद निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व त्यासाठी पक्षाची रणनिती, भारत जोडो यात्रेचा संदेश राज्यभर पोहचवण्यासाठी विशेष अभियान राबवण्याबाबत तसेच हाथ से हाथ जोडो अभियानाबाबत या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

Share This News

Related Post

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर; वसंत मोरेंची घेतली भेट

Posted by - December 9, 2022 0
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये आज अमित ठाकरे यांनी वसंत…
Supriya Sule

Contractual Recruitment : ‘कंत्राटी’ भरतीसंदर्भात ‘त्या नेत्यांचे राजीनामे घ्या’, सुप्रिया सुळेंची फडणवीसांकडे मागणी

Posted by - October 21, 2023 0
मुंबई : कंत्राटी भरतीच्या (Contractual Recruitment) मुद्यावरून राज्यात राजकारण चांगलंच तापलंय, कारण महाविकास आघाडी सरकारचे पाप आपल्या माथी नको, असं…

#MARATHI RECIPE : तोच तोच वरण-भात खाऊन कंटाळा आलाय ? मसूर डाळी पासून बनवलेलं हे वरण नक्की ट्राय करा !

Posted by - February 22, 2023 0
रोज रोज वरण भात खाऊन कंटाळले असाल तर मसूर डाळीपासून बनवलेलं हे वरण नक्की ट्राय करून पहा. सामान्यतः आपण तूरडाळ…

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी घेतली कोविड टास्क फोर्सची बैठक; आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश

Posted by - December 28, 2022 0
पुणे : परदेशात वाढणारी कोविड-१९ रुग्णांची संख्या लक्षात घेता या साथरोगाला प्रतिबंध करण्यासाठी तसेच यातून निर्माण होऊ शकणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला…
Fake Notes

Solapur News : सोलापूरमध्ये सापडला बनावट नोटांचा छापखाना; घरातून जप्त केल्या 5 लाखांच्या नोटा!

Posted by - July 24, 2023 0
सोलापूर : काही दिवसांपूर्वी अभिनेता शाहीद कपूरची फर्जी नावाची सिरीज मोठ्या प्रमाणात गाजली होती. या सिरीजमध्ये शाहीदने ज्या प्रकारे बनावट…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *