भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने सिंगापूरमध्ये जिंकले सुवर्णपदक

122 0

सिंगापूर- ऑलिम्पिक पदक विजेती आणि भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने आज सिंगापूर वेटलिफ्टिंग इंटरनॅशनल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. या यशामुळे ती राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.

चानू प्रथमच 55 किलो वजनी गटाच्या स्पर्धेत सहभागी झाली आहे. या स्पर्धेत तिने 191 किलो (86 किलो आणि 105 किलो) वजन उचलले. तिला कोणत्याही खेळाडूकडून आव्हान मिळाले नाही. मीराबाईनंतर दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाची जेसिका सेवास्टेन्को आहे. जेसिकाने मीबराबाई खालोखाल 167 किलो (77 किलो आणि 90 किलो) वजन उचलले. त्यानंतर मलेशियाच्या अ‍ॅली कॅसांड्रा एंजेलबर्टने 165 किलो (75 किलो आणि 90 किलो) वजनासह तिसरे स्थान पटकावले.

मागच्या वर्षी टोकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकून मीराबाईने इतिहास रचला आहे. मीराबाईच्या या यशामुळे भारताचा वेटलिफ्टिंगमधील पदकाची 21 वर्षांची प्रतीक्षा संपली. मीराबाई चानूने 49 किलो वजनी गटात हे पदक जिंकले होते. मीराबाईने स्नॅच अँड क्लीन अँड जर्क फेऱ्यांमध्ये एकूण 202 किलो वजन उचलून हे पदक जिंकले होते.

दरम्यान, टोकियो स्पर्धेनंतर आता ही पहिलीच स्पर्धा आहे. ऑलिम्पिकनंतर तिने डिसेंबरमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून माघार घेतली होती. 27 वर्षीय चानू कॉमनवेल्थ रँकिंगच्या आधारे 49 किलो वजनी गटात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरली होती. मात्र, भारताला आणखी सुवर्णपदके मिळण्याची शक्यता वाढवण्यासाठी चानूने 55 किलो वजनी गटात भाग घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सिंगापूर वेटलिफ्टिंग आंतरराष्ट्रीय स्पर्धा ही यावर्षी बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पात्रता स्पर्धा आहे. या स्पर्धेत प्रत्येक वजन गटातील अव्वल आठ वेटलिफ्टर्स थेट राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत.

Share This News

Related Post

पुणे बंद ! मूकमोर्चाचं जाहीर सभेत रूपांतर… लाल महाल येथून थेट दृश्य

Posted by - December 13, 2022 0
पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे आज पुण्यामध्ये कडकडीत बंद पाण्यात आला…
Sachin Tendulkar

‘स्वच्छ मुख अभियाना’चा ‘स्माइल ॲम्बेसेडर’ म्हणून सचिन तेंडुलकर यांची नियुक्ती

Posted by - May 30, 2023 0
मुंबई : प्रसिद्ध क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांची राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे (Clean Mouth Campaign) स्माइल ॲम्बेसेडर…
ED

Sachin Sawant : वरिष्ठ IRS अधिकारी सचिन सावंत यांना सीबीआयकडून अटक

Posted by - June 28, 2023 0
मुंबई : वरिष्ठ आयआरएस अधिकारी सचिन सावंत (Sachin Sawant) यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. 500 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक…
Pune Prakalp

पुण्यात तयार होणार पहिला कचर्‍यातून हायड्रोजन निर्मितीचा प्रकल्प

Posted by - June 3, 2023 0
पुणे : शहरात तयार होणाऱ्या महाकाय कचऱ्याच्या डोंगराची डोकेदुखी येत्या दिवाळीपर्यंत बंद होणार आहे. महापालिका प्रशासन केंद्राच्या मदतीने दररोज 350…
Jalgaon Robbery

खाकी पेशाला काळिमा ! निलंबीत पोलिस उपनिरीक्षकानेच टाकला जळगाव स्टेट बँकेवर दरोडा

Posted by - June 4, 2023 0
जळगाव : जळगावमध्ये (Jalgaon) पोलिसी पेशाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये 1 जून रोजी भर दिवसा जळगाव शहरातील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *