मराठी विज्ञान परिषद संस्थापक म.ना.गोगटे यांचे निधन

254 0

मराठी विज्ञान परिषदेचे संस्थापक म.ना.गोगटे यांचे पुणे येथे त्यांच्या रहात्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. ते म.ना. नावाने प्रसिद्ध होते. 1932 साली  मुंबई येथे जन्माला आलेले म.ना. यांनी पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयामधून बी.ई. (स्थापत्य अभियांत्रिकी) आणि लंडन विद्यापीठामधून एम.एस्सी. (अभियांत्रिकी) ही पदवी मिळविली. त्यांनी चाळीस वर्षे
वास्तुविशारद, व्हॅल्युअर आणि स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये स्वत:चा व्यवसाय केला. मराठीतून विज्ञान प्रसार करणाऱ्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्यासाठी त्यांनी अतोनात कष्ट घेतले. मराठी साहित्य परिषद, मराठी विज्ञान परिषद तसेच अभियांत्रिकी क्षेत्रातील कार्यकर्त्यांची सांधेजोड करण्याचे काम केले. गेली 25 वर्षे ते पुणे येथे स्थायिक होते. मराठी भाषेत ऑ आणि ॲ हे स्वर स्वीकारले जावे म्हणून त्यांनी यशस्वी प्रयत्न केले. तसेच रोमन लिपीचा पुरस्कार त्यांनी केला होता. पूर्ण नावात आईचा उल्लेख असावा यासाठी त्यांनी आपले नाव – मधुकर इंदिरा नारायण असे लिहायला 45 वर्षांपासून सुरूवात केली.
त्यांच्यामागे पत्नी सुप्रसिद्ध संगीतनाट्य अभिनेत्री निर्मला गोगटे, दोन कन्या, जावई आणि नातवंडे तसेच मोठा चाहता वर्ग असा परिवार आहे.

Share This News

Related Post

Maharashtra Politics : शरद पवार यांची सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांनी घेतली भेट, पीयूष गोयल यांच्यासोबत बैठक

Posted by - July 20, 2022 0
नवी दिल्ली: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देशातील ज्येष्ठ, अनुभवी, अभ्यासू नेते म्हणून त्यांचा सर्वच राजकीय पक्षाचे नेते आदर करत…
Dombivli Blast

Dombivli Blast : डोंबिवली स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

Posted by - May 24, 2024 0
डोंबिवली : डोंबिवली कंपनी स्फोट (Dombivli Blast) प्रकरणी नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. डोंबिवली एमआयडीसी अमुदान कंपनीच्या फरार मालक…

पुणे : आत्महत्या करणारया इसमाला अग्निशमन दलाकडून जीवदान

Posted by - October 1, 2022 0
पुणे : काल दिनांक ३०|०९|२०२२ रोजी राञी ११ वाजता सिहंगड रस्ता, वडगाव बुद्रुक, जुन्या पोस्ट ऑफिस जवळ, श्रद्धा अपार्टमेंट येथे…

बांधकाम व्यावसायिक युवराज ढमालेंसह भागीदारांकडून महापालिका व रहिवाशांची फसवणूकीचा आरोप; फसवणूक झाली नसल्याचं रहिवाशांनी दिलं स्पष्टीकरण

Posted by - March 16, 2023 0
कोंढवा येथील राजगृही बिझनेस हब कमर्शियल प्रिमायसेस सहकारी संस्थेची इमारत युवराज ढमाले, विकी संघवी व इतर विकासकांनी बांधली आहे. येथील…
Narendra Modi Sabha

Narendra Modi : पुण्याच्या सभेत पंतप्रधान मोदींनी घातली खास पगडी

Posted by - April 29, 2024 0
पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सगळीकडे प्रचाराचा धुराळा उडाला आहे. दोन टप्प्यात मतदान पार पडल्यानंतर आता तिसऱ्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *