राज्यातील सर्व दुकानं व आस्थापनांना मराठी नामफलक लावणं बंधनकारक ! शासनाकडून अधिनियम लागू

110 0

राज्यातील सर्व दुकानं व आस्थापनांचा नामफलक मराठी देवनागरी लिपित लावण्याबाबतचा अधिनियम जारी झाला असून आता यापुढे महाराष्ट्रातील सर्व दुकाने तसेच आस्थापनांना मराठी भाषेतील नामफलक प्रदर्शित करणे अनिवार्य असणार आहे. यापूर्वीच्या तरतुदीत 10 पेक्षा कमी कामगार असलेल्या दुकाने व आस्थापनांना मराठी नामफलक लावण्याची तरतूद नव्हती. याबाबत मंत्रिमंडळाच्या मान्यतेने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तींचे विनियमन) अधिनियम, 2017 मध्ये सुधारणा करणेबाबतचे विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहात मान्य झाले असून, या नवीन अधिनियमास राज्यपालांनी संमती दिली आहे.

सदरहू महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमान्वये 10 पेक्षा कमी कामगार नोकरीवर ठेवणाऱ्या दुकाने व आस्थापनांना मराठी भाषेचा नामफलक लावणे बंधनकारक आहे. मराठी भाषेतील अक्षरलेखन, नामफलकावर सुरूवातीलाच लिहिणे आवश्यक असून मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार (Font) हा इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही. त्याचप्रमाणे ज्या दुकाने व आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा मद्य विकले जाते अशा दुकाने व आस्थापनांच्या नामफलकावर महान व्यक्तीची किंवा गड-किल्यांची नावे लिहिता येणार नाहीत अशी तरतूद सदर अधिनियमात करण्यात आली आहे.

Share This News

Related Post

Nashik Crime

Nashik Crime : वडिलांना मारहाण केल्याचा धक्का सहन न झाल्याने तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल

Posted by - October 14, 2023 0
नाशिक : धार्मिक नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिक शहरात (Nashik Crime) गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. यामध्ये…
Sangli News

Sangli News : धक्कादायक ! सांगलीमध्ये 2 मित्रांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत

Posted by - September 15, 2023 0
सांगली : सांगलीमध्ये (Sangli News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मिरजेच्या कृष्णात धुणे धुण्यासाठी पाच परप्रांतीय तरुण गेले…

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

Posted by - August 13, 2022 0
दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती जयराम रमेश यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे…
Beed Warkari

वारकऱ्यांच्या दिंडीचा अपघात ! दिंडीत रिक्षा घुसल्याने अनेक वारकरी जखमी

Posted by - June 13, 2023 0
बीड : जळगाव जिल्ह्यातील रावेरहून पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीचा बीडमध्ये अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोन वारकरी गंभीररित्या जखमी…
Mansoon Session

Monsoon Session : राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सोमवारपासून; ‘या’ 4 मुद्द्यांमुळे पावसाळी अधिवेशन ठरणारं वादळी

Posted by - July 16, 2023 0
मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session) 17 जुलैपासून सुरुवात होत असून या अधिवेशनाकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. अजित पवार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *