पुण्यात मराठा दसरा मेळावा संपन्न

316 0

पुणे : मराठासेवक समिती महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित केला जाणारा मराठा दसरा मेळावा काल (दि.५ ऑक्टोबर) पुण्यातील अण्णाभाऊ साठे सभागृह याठिकाणी उत्साहात पार पडला. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातुन एकत्र आलेल्या मराठासेवकांच्या माध्यमातुन दरवर्षी या मेळाव्याचे आयोजन केले जात असून यंदा या मेळाव्याचे सहावे वर्ष होते.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड, जालना येथील महिला उद्योजक सौ.सीताबाई मोहिते, बँक पतपुरवठा विषयाचे अभ्यासक प्रा.श्रीधर भवर आणि युवा प्रवचनकार चैतन्य महाराज वाडेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

प्रविणदादा गायकवाड यांनी “अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला” या विषयावर मार्गदर्शन करताना मराठा तरुणांनी आरक्षणाच्या पलीकडे जाऊन अर्थकारणाच्या विषयाकडे वळावे असे मत मांडले. तसेच परदेशात उपलब्ध असणाऱ्या नोकरी, उद्योग व्यवसायाच्या संधींची माहिती देऊन त्यांनी भविष्यात मराठा समाज हा बिजनेस कम्युनिटी म्हणून ओळखला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

सौ.सीताबाई मोहिते यांनी “शेती व शेतीपुरक व्यवसाय” या विषयावर बोलताना बाजारात जे विकले जाते ते आपल्या शेतीत पिकवता आले पाहिजे हा विचार मांडला. यावेळी आवळा कँडी व्यवसायातील आपल्या यशाचा प्रवास उलगडून सांगितला. शेतीपुरक व्यवसाय करण्यासाठी तरुणांची मानसिकता व्यावसायिकाची असावी लागते असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला.

प्रा.श्रीधर भवर यांनी “नवीन व्यवसाय व भांडवल उभारणी” या विषयावर मार्गदर्शन करताना नवउद्योजकांना भांडवल उभारणी करताना किंवा कर्ज मिळवताना येणाऱ्या अडचणी व त्यावर मात करण्याचे उपाय यावर भाष्य केले. बँकेच्या माध्यमातून भांडवल उभारणी करताना कोणत्या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टींवर सजगपणे लक्ष दिले पाहिजे यातील बारकावे त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितले.

युवाकीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांनी “महापुरुषांचे विचार व आजचा तरुण” या विषयावर मांडणी करताना तरुणांना वर्तमानातील आपल्या खऱ्या समस्या काय आणि त्या दूर करण्यासाठी आपल्या महापुरुषांनी सांगितलेले विचार किती दिशादर्शक आहेत यावर प्रकाश टाकला. आजची तरुणाई कोणत्या दिशेला चालली असा प्रश्न विचारुन त्यांनी प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याची खंत मांडली.

यंदाच्या दसरा मेळाव्यात नोकरी, उद्योग-व्यवसायात काम करणार्‍या ले छ्लांग फाऊंडेशन, मराठा उद्योजक लॉबी, प्रियदर्शनी बँक ली.कळंब यांचा तर कोरोंना काळात केलेल्या कामाबद्दल वर्ल्ड माराठा ओर्गनायजेशन पुणे टिम सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या विविध भागांतील मराठा सेवकांबरोबरच मराठा चळवळीतील विविध संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची देखील उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठासेवक समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Share This News

Related Post

गुजरातेत घड्याळाचे काटे फिरले ! राष्ट्रवादीच्या एकमेव आमदाराचा पक्षाला रामराम

Posted by - November 15, 2022 0
गुजरातमध्ये ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे फिरल्याचं पाहायला मिळतंय. गुजरातमधील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार कंधाल जाडेजा यांनी पक्षाला रामराम…
Pune Fight Video

Pune Fight Video : पुणे रेल्वे स्टेशनवर दोघांची फ्री स्टाईल हाणामारी

Posted by - August 5, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण (Pune Fight Video) झाला आहे. पुणे रेल्वे स्थानकावरील (Pune Fight Video)…

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचं विश्वस्त मंडळ बरखास्त; उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाचा आदेश

Posted by - September 13, 2022 0
शिर्डी : मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठानं आज शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचं विश्वस्त मंडळ बरखास्त केलं.न्यायमूर्ती आर. डी. धानुका…

मानवाधिकारांवर जयशंकर यांनी अमेरिकेला दिले सणसणीत प्रत्युत्तर

Posted by - April 14, 2022 0
वॉशिंग्टन- अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात शीखांवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांदरम्यान भारताच्या कथित मानवाधिकार उल्लंघनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या अमेरिकेला भारताचे परराष्ट्र मंत्री…
Gold Scheme

Sovereign Gold Bond Scheme: 11 सप्टेंबरपासून स्वस्त सोनं खरेदी करता येणार; जाणून घ्या किंमत, डिस्काउंट अन् बरंच काही

Posted by - September 9, 2023 0
आरबीआय लोकांना स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी देत ​​आहे. हे सोनं तुम्ही बाजारभावापेक्षा कमी किमतींत खरेदी करू शकता. ग्राहकांना सॉव्हरिन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *