जनरल मनोज पांडे यांनी स्वीकारली लष्करप्रमुखपदाची सूत्रे

404 0

नवी दिल्ली – जनरल मनोज पांडे यांनी आज लष्करप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. मावळते लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी जनरल मनोज पांडे यांच्याकडे लष्करप्रमुखपदाची सूत्रे सोपवली. आता देशाच्या लष्कराचे नेतृत्व सलग दुसऱ्यांदा एका मराठी अधिकारी करणार आहे.

मनोज पांडे हे मूळ नागपूरचे असून चौथे मराठी अधिकारी लष्कराच्या प्रमुखपदी विराजमान झाले आहेत. नरवणे हेदेखील मराठीच असल्याने सलग दुसऱ्यांदा मराठी अधिकाऱ्याला लष्करी दलाचे प्रमुख होण्याचा मान मिळाला. केंद्र सरकार व संरक्षण मंत्रालयातील उच्चपदस्थ समितीने सेवा ज्येष्ठतेनुसार ले.जनरल पांडे यांची देशाचे आगामी लष्करप्रमुख म्हणून निवड केली आहे.

ले. ज. मनोज पांडे हे पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असून, डिसेंबर 1982 मध्ये कोअर ऑफ इंजिनियर्स (द बॉम्बे सॅपर्स) मध्ये ते नियुक्त झाले. जनरल ऑफिसर म्हणून त्यांनी जम्मू आणि काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळील संवेदनशील पल्लनवाला क्षेत्रात ऑपरेशन पराक्रम दरम्यान इंजिनीअर रेजिमेंटचे नेतृत्व केलेले आहे. ते स्टाफ कॉलेज, कॅम्बरली (युनायटेड किंगडम)चे पदवीधर आहेत. त्यांनी हायर कमांड (एचसी) आणि नॅशनल डिफेन्स कॉलेज (एनडीसी) अभ्यासक्रमांचे शिक्षण घेतलेले आहे. लष्करातील 39 वर्षांच्या कारकिर्दीत, त्यांनी विविध महत्वाच्या पदांची यशस्वीपणे जबादारी सांभाळली आहे.

चार मराठी लष्करप्रमुख

गोपाळ गुरूनाथ बेवूर (१६ जानेवारी १९७३ ते ३१ मे १९७५) व अरुणकुमार वैद्य (१ ऑगस्ट १९८३ ते ३१ जानेवारी १९८६) हे मराठी अधिकारी लष्करप्रमुख झाले होते. आता मनोज नरवणे यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे चौथे मराठी अधिकारी लष्करप्रमुखपदी विराजमान झाले आहेत. उपप्रमुखांचा विचार केल्यास, लेफ्टनंट जनरल पांडे यांच्याआधी ४२ पैकी फक्त १० अधिकाऱ्यांना लष्करप्रमुख होता आलं आहे.

लष्करात ‘लढाऊ आर्म’ व ‘सेवा आर्म’ असे दोन भाग असतात. पायदळ, रणगाडा व तोफखाना हे तीन प्रमुख लढाऊ आर्म असतात. या जोडीलाच ‘इंजिनीअर्स’देखील युद्धस्थितीत किंवा संकटसमयी सीमेवर उभे राहून शत्रूचा सामना करतात. त्यामुळेच ‘इंजिनीअर्स’ हेदेखील ‘लढाऊ आर्म’ म्हणून गणले जाते. लष्करात आजवर २७ पैकी २२ प्रमुख हे पायदळातील होते. या स्थितीत ‘इंजिनीअर्स’ना मनोज पांडे यांच्या रुपाने पहिल्यांदाच लष्करप्रमुखपदाची संधी मिळाली आहे.

Share This News

Related Post

PUNE CRIME : परदेशातील नोकरीसाठी सोशल साइट्सचा वापर करताना सावधान! अनेकांना घातला जातोय लाखोंचा गंडा

Posted by - December 26, 2022 0
परदेशात नोकरी करायचीये ? परदेशात नोकरी करण्यासाठी सोशल साइट्सचा वापर करताय ? तुम्हाला परदेशात नोकरी मिळवून देण्यासाठी मी मदत करतो,…

BJP Leader Udayanraje Bhosale : ” शिवाजी महाराजांच्या नावाने पक्ष स्थापन केला , मग मी म्हणू का पक्ष माझा आहे …! “

Posted by - August 12, 2022 0
पुणे : भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी पुण्यामध्ये दीपक केसरकर यांची भेट घेतली . या भेटीमध्ये महाबळेश्वरचा पर्यटन विकास या…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सर्व जागा लढविणार

Posted by - November 9, 2022 0
पुणे : पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूक प्रक्रियेसाठी महाविकास आघाडीने सर्व जागांवर आपले उमेदवार उभे केले असून महाविकास आघाडी ही निवडणूक…

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका; ब्रीच कँडी येथे दाखल

Posted by - April 13, 2022 0
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली आहे. त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये…

‘राज’ गर्जना होणार! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला अखेर परवानगी

Posted by - April 28, 2022 0
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये होणाऱ्या जाहीर सभेला परवानगी अखेर परवानगी मिळाली आहे. औरंगाबाद पोलिसांकडून ही…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *