श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी माणिक चव्हाण, तर सरचिटणीसपदी हेमंत रासने यांची नियुक्ती

4416 0

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी ट्रस्टचे विद्यमान सरचिटणीस माणिक चव्हाण यांची एकमताने निवड करण्यात आली. गुरुवार (दि.१५) झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून पुढील २ वर्षांकरीता माणिक चव्हाण यांची ट्रस्टच्या अध्यक्षपदी तर सरचिटणीसपदी हेमंत रासने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विश्वस्त मंडळाच्या बैठकीला ट्रस्टचे डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, हेमंत रासने, अक्षय गोडसे, अमोल केदारी, कुमार वांबुरे, मुरलीधर लोंढे, उत्तमराव गावडे आदी उपस्थित होते. माणिक चव्हाण हे ट्रस्टचे विद्यमान सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. माणिक चव्हाण हे ट्रस्टच्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक उपक्रमांमध्ये गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ कायमच सक्रिय सहभागी असतात. तसेच कोविड काळात ट्रस्टने केलेल्या मदतकार्यात देखील स्वत: रस्त्यावर उतरुन त्यांनी सहभाग घेतला होता.

ट्रस्टने यापूर्वी घोषणा केल्यानुसार १५ सप्टेंबर रोजी विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सन २०२२ ते २०२४ याकरिता ट्रस्टच्या अध्यक्षपदी माणिक चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, विश्वस्त कुमार वांबुरे, मुरलीधर लोंढे, उत्तमराव गावडे हे वरील पदांवर कार्यरत राहणार आहेत.

पुढील १४ वर्षांचे नियोजीत अध्यक्ष
सन २०२२ ते २०२४ याकरिता ट्रस्टच्या अध्यक्षपदी माणिक चव्हाण, सन २०२४ ते २०२६ अशा पुढील दोन वर्षांकरीता ट्रस्टच्या अध्यक्षपदी सुनील रासने, सन २०२६ ते २०३१ या पुढील पाच वर्षांकरीता महेश सूर्यवंशी आणि सन २०३१ ते २०३६ या त्या पुढील पाच वर्षांकरीता हेमंत रासने हे ट्रस्टचे अध्यक्षपद भूषविणार असल्याचा महत्वाचा निर्णय देखील एकमताने घेण्यात आला आहे. यामाध्यमातून पुढील १४ वर्षांचे नियोजीत अध्यक्ष देखील यावेळी एकमताने ठरविण्यात आले. बैठकीनंतर सर्व विश्वस्तांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली.

Share This News

Related Post

36 आमदार सोबत एकूण संख्याबळ 50 पर्यंत जाईल – बच्चू कडू

Posted by - June 22, 2022 0
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्याच विरोधात बंडाचे अस्त्र उगारलं असून शिंदे शिवसेनेच्या आमदारांसह सुरत मध्ये दाखल झाले होते त्यानंतर…
Liver Donate

Liver Donate : पोरीने ऋण फेडले! बापाला यकृत दान करून मरणाच्या दारातून माघारी आणले

Posted by - June 18, 2023 0
पुणे : आईचा जास्त जीव हा तिच्या मुलामध्ये असतो, तर वडिलांचा जास्त जीव हा त्यांच्या मुलींमध्ये असतो असे म्हटले जाते.…

ऑनलाईन शिक्षणासाठी केंद्र सरकार देणार 3 महिन्यांचा फ्री रिचार्ज ?… जाणून घ्या सत्यता

Posted by - March 8, 2022 0
सोशल मीडीयामध्ये अनेक मेसेज कोणत्याही तथ्यांची तपासणी न करता फॉर्वर्ड केले जातात. त्यामुळे फेक न्यूज झपाट्याने पसरल्या जातात. सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर…
Buldhana Accident

Buldhana Accident : मलकापूर शहरात दोन ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; 7 जणांचा जागीच मृत्यू

Posted by - July 29, 2023 0
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातून (Buldhana Accident) मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये मलकापूर शहरातील महामार्ग क्रमांक 6 वरती दोन ट्रॅव्हल्सचा…

#पुणे महानगरपालिकेने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Posted by - March 27, 2023 0
पुणे : हवामान विभागाने पुढील वर्षी पावसाचे प्रमाण कमी असण्याचे संकेत दिले असल्याने पुणे महानगरपालिकेने आतापासून पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *